मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार-तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.25 - मुख्यमंत्री सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत तहसिल कार्यालय व परिसराची साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दरम्यान मुख्यमंत्री सात कलमे कार्यक्रमानिमित्त नागरिकांच्या समस्या व तक्रारींना विशेष प्राधान्य देणार असल्याचे तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री सात कलमी कृती कार्यक्रमांतर्गत तहसिल कार्यालयाची स्वतंत्र वेबसाईट बनविण्यात आली आहे.याशिवाय कार्यालय व कार्यालय परिसराची स्वच्छता कार्यालयात भेटी साठी दिवस,वेळ निश्चितीचा फलक,नागरिकांच्या तक्रारी निवारण,क्षेत्रभेटी प्रकल्प कामांनाभेटी दिल्या जात आहेत यासाठी नागरिकांनीही महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सोयगाव च्या तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments