सोयगाव दि.24 - सोयगाव तालुक्यातील जरंडी सह अकरा गावात खासदार डॉ कल्याण काळे यांनी शुक्रवारी भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या आहे यावेळी खासदर डॉ कल्याण काळे यांनी आगामी आठवड्यात तालुका प्रशासनाची आढावा बैठक घेऊन सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले हा केवळ संवाद दौरा आहे या संवाद दौऱ्यात मी अडचणी समजून घेण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी दौऱ्यात सांगितले खासदार डॉ कल्याण काळे यांनी भेटी देत ग्रामस्थाच्या समस्या जाणून घेतल्या
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे, शिवसेना तालुकाप्रमुख(उबाठा) दिलीप मचे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू काळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) शहराध्यक्ष रवी काळे,दिनेश हजारी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ इंद्रजित सोळुंके, आदींची उपस्थिती होती.दरम्यान यावेळी खासदार डॉ कल्याण काळे यांनी तिखी, बहुलखेडा, रामपूर वाडी,रामपुरा तांडा,निंबायती,निंबायती गाव,.जरंडी,माळेगाव, पिंपरी, कंकराळा,या अकरा गावांना भेटी देऊन ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या यावेळी जरंडीला ग्रामपंचायत, सावित्रीबाई फुले अभ्यासिका,संगीत विद्यालय आदी विविध विकास कामांची पाहणी केली यावेळी उपसरपंच संजय पाटील,दिलीप पाटील, डॉ अविनाश पाटील,श्रीराम पाटील,सुधीर कुलकर्णी,विजय चौधरी, कल्याण चव्हाण निंबायती येथील राजू पाटील, राहुल गोसावी, विनोद पाटील,शमा तडवी,मौलाना फिरोज शेख, निजाम तडवी,अजीज तडवी,बाळा तडवी, तोसिफ शेख,सतीश बाविस्कर,आदींची उपस्थिती होती..
0 Comments