दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.24 - सोयगाव वनपरिक्षेत्रातून लाकडाने भरलेला ट्रक दि.22 बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास फरदापुर येथे पकडल्याची माहिती सोयगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी दिली.
पकडण्यात आलेल्या ट्रक जवळ वनरक्षक शरद चेके हे होते त्यानंतर सोयगाव येथून खाजगी वाहनाने आलेले इतर कर्मचारी हे त्याठिकाणी उपस्थित होते. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना वारंवार माहिती विचारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली. सत्तेचा महासंग्राम मध्ये बातमी प्रकाशित होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर मात्र दि.24 शुक्रवारी वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी भ्रमणध्वनीद्वारे अशी माहिती दिली, लाकडांने भरलेला ट्रक जवळ वनरक्षक शरद चेके हे एकटे होते ट्रक चालकाने गाडी साईडला घेतो असे सांगून अंधाराचा फायदा घेत ट्रक घेऊन पसार झाला. त्याबाबत फरदापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.परंतु मुद्देमाल व फोटो नसल्याने त्यांनी तक्रार घेतली नाही. आपण फरदापुर पोलीस ठाण्यातून माहिती घेऊनच बातमी टाकावी असे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांनी सांगितले.या प्रकरणी फरदापुर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रफुल्ल साबळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता वनविभागाचा वेगळा गुन्हा असतो त्याचा आपल्याकडे काही संबंध नाही त्यामुळे फरदापुर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही असे साबळे यांनी सांगितले. दरम्यान ट्रक चालक ट्रक घेऊन पसार होत असल्याचे वनरक्षक शरद चेके यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी ट्रक कोणत्या रस्त्याला गेला याबाबत वरिष्ठांना माहिती दिली किंवा नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनरक्षकाने फरदापुर पोलिसांची तात्काळ मदत का घेतली नाही.मदत घेतली असती तर योग्य कार्यवाही झाली असती परंतु ट्रक अजिंठा वनविभागाच्या ताब्यात द्यायचाच नव्हता त्यामुळे सोयगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्याने ट्रक पसार झाल्याचा बनाव करीत आर्थिक देवाण घेवाणीतून लाकडाने भरलेला ट्रक पसार करण्यात सोयगाव वनविभाग यशस्वी झाल्याचे वनपरिक्षेत्राचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या गोलमोल माहिती वरून स्पष्ट झाले आहे! जागरूक नागरिक व वृक्षप्रेमींनी सोयगाव वनविभागास वेळोवेळी गोपनीय माहिती देत जीव धोक्यात घालून ट्रक पकडण्यात मदत केली परंतु आर्थिक देवाणघेवाणीतून लाकडाने भरलेला ट्रक पसार करण्यास सोयगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यानेच मदत केल्याचा आरोप भाजपचे सुनील गावंडे व मंगेश सोहनी यांनी केला आहे.याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबन करण्यात यावे यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया-1) सोयगाव वनपरिक्षेत्रात अवैधरीत्या वृक्षांची कत्तल करून मोठ्या प्रमाणात लाकूड तस्करी केली जात आहे. वृक्षांची कत्तल थांबावी यासाठी जागरूक नागरिकाची भूमिका आम्ही पार पाडत असताना सोयगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी लाकूड तस्करांना पाठीशी घालून नागरिकांच्या भावनेशी खेळू नये.
श्री. मंगेश सोहनी, भाजप नेते
प्रतिक्रिया-2) अनेक वर्षांपासून सोयगाव वनपरिक्षेत्रात वृक्षांची अवैधरीत्या तोड केली जात आहे. सोयगाव वनविभागाचे व लाकूड तस्करांचे लागेबांधे असल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे. फरदापुर प्रकरणी मुख्यमंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून संबंधित वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल.
श्री.सुनील गावंडे, भाजप नेते सोयगाव
0 Comments