प्रयागराज --
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सध्या महाकुंभ मेळा सुरू असल्यामुळे व आज मौनी अमावस्या निमित्त महत्त्वाचे शाही स्नान असल्यामुळे येथे मोठी भाविकांची गर्दी झाली आहे. देशविदेशातील नागरिकांसह भारतातूनही मोठ्या संख्येनं पर्यटक आणि भाविकांनी प्रयागराज गाठलेलं आहे. सुमारे दहा ते बारा कोटी भाविक येथे आल्याची समजते. मात्र या ठिकाणी बुधवारी पहाटेच्या सुमारास अतिशय भयावह घडली आहे .
मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगा स्नानासाठी प्रचंड गर्दी उसळली आणि प्रयागराज इथं बुधवारी पहाटे भयंकर चेंगराचेंगरी झाली. पहाटे ब्रॅरेकेट उघडताच भाविकांनी एकच धावपळ केली .व चेंगराचेंगरी झाली.हि
चेंगराचेंगरी इतकी भीषण स्वरुपातील होती, की इथं अनेकांचाच घटनास्थळी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती आणि महाकुंभसाठी झालेली एकंदर गर्दी पाहता घटनास्थळी तातडीनं रुग्णवाहिका दाखल होत यंत्रणांनीही इथं धाव घेतली. या संपूर्ण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्याकडून घटनेचा आढावा घेतला.
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. या घटनेत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. संगम घाटावर अमृतस्नानासाठी जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्यानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सर्व 13 आखाड्यांनी आज मौनी अमावस्याच होणारं अमृतस्नान रद्द केल्याची माहिती आहे. आता 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीला अमृत स्नान होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर साध्वी निरंजन ज्योती यांनी म्हटलं आहे की, सरकारने या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.
सर्व तेरा आखाड्यानं या दु:खद घटनेनंतर अमृतस्नान न करण्याचा निर्णय घेतल्याचं साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितलं. या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त करत सरकारकडे या घटनेच्या चौकशीची मागणी केली. याशिवाय या प्रकरणात साध्वी निरंजन ज्योती यांनी विरोधी पक्षांना इशारा दिला आहे. विरोधकांनी यावर राजकारण करु नये, असं साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या.
साध्वी निरंजन ज्योती पुढं म्हणाल्या की ही दु:खद घटना आहे. या घटनेवर कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये.या प्रकरणात आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणा समोर आलेला नाही. आतापर्यंत 5 कोटी लोकांनी सुरक्षितपणे स्नान केल्याचं साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या. महंत राजूदास यांनी प्रशासनासोबत आघाड्यांची बैठक सुरु असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत मोठ्या संख्येनं लोक जखमी झाले आहेत. या घटनेत 50 हून अधिक लोक जखमी झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.पण अधिकृत माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. जखमींची संख्या 50 हून अधिक जखमी झाल्याची माहिती आहे. महाकुंभमेळ्यात दाखल झालेल्या भाविकांना संगम घाटावरच अमृतस्नान करायचं होतं. त्यामुळं त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. स्नानासाठी ब्रह्ममुहूर्ताची वाट पाहत असताना ही दुर्घटना घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभमेळ्यातील या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा केली आहे. नरेंद्र मोदी यांनी घटनेची माहिती घेत मदत कार्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले.
दरम्यान श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे राज्यराजेश्वरी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्याशी संपर्क साधला असता भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेमुळे दुःख व्यक्त होत आहे. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आलेले भाविक संगमात स्नान करत आहेत. आखाडा परिषदेने अमृतनान रद्द केले आहे. वसंत पंचमीला आखाड्यांचे अमृत स्नान होणार आहे. वृद्ध, लहान मुले यांनी प्रचंड अशा गर्दीत शक्यतो जाणे टाळावे. प्रशासन मोठे कार्य करत आहे. प्रशासनाला भाविकांनी सहकार्य करावे. असे आवाहनही राजराजेश्वरी महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी केले आहे.
0 Comments