दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.20 -सोयगाव तहसील कार्यालयात दि.20 सोमवारी सोमवारी आयोजित नवीन वर्षातील पहिल्याच लोकशाही दिनी पहिल्यांदाच महिलांची समस्या घेवून मोठी गर्दी आढळून आली. तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिनात महिलांच्या पाच पैकी तीन तक्रारी सोडविण्यात आल्या तर एका तक्रारीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांनी दिली आहे.
दरम्यान सन 2025 या वर्षातील पहिल्या लोकशाही दिनात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली तसेच अवैद्य गौण खनिज वाहतूक, मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कार्यक्रम, राष्ट्रीय मतदार दिन,26 जानेवारी साजरी करणे, हिरकणी कक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेवेबाबत तसेच एस टी महामंडळाच्या बस सेवा बाबत चर्चा करण्यात आली.यावेळी नायब तहसीलदार संभाजी देशमुख काकासाहेब सावळे,बहुरे,सहाय्यक गटविकास अधिकारी तात्याराव माळी, गटशिक्षणाधिकारी रंगराव आढाव,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे,पंकज बारवाल,प्रकल्प अधिकारी सविता सैवर,आगारप्रमुख मनीष जवळीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गितेश चावडा, उज्वला वामने,महेंद्र पवार,विजय उमाळकर,आर.डी. जाधव आदींसह सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल सहाय्यक गोपीनाथ जयवळ,अनिल पवार,संतोष नवगिरे,संजय नावकर,राहुल जयवळ,संभाजी बोरसे आदींनी पुढाकार घेतला.
--तीन यंत्रणा चे प्रतिनिधी-
वनविभाग, सामाजिक वनीकरण,सार्वजनिक बांधकाम या यंत्रणेचे अधिकारी लोकशाही दिनी गैरहजर होते.
0 Comments