शेतकऱ्यांनी पोलीस कम्प्लेंट करूनही चोरांचा तपास लागत नाही... वाकडी ग्रामस्थांची मागणी

लोहगाव (वार्ताहर)

वाकडी गावात अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे, यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, अनेक शेतकऱ्यांनी पोलीस कम्प्लेंट करून पण या चोरांचा तपास लागलेला नाही त्यामुळे आज वाकडी गावातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने या वाढत्या चोऱ्या संदर्भात आळा घालण्यात यावा व त्यांचा तात्काळ शोध घेण्यात यावा यासंबंधीचे निवेदन आज श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री चौधरी साहेब यांना श्रीरामपूर येथे देण्यात आले, 


सदर निवेदन देण्यासाठी गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन श्री शिवाजीतात्या लहारे पा.,उपसरपंच श्री सुरेशभाऊ जाधव पा., आमदार श्री आशुतोषदादा काळे युवा मंच अध्यक्ष श्री अण्णासाहेब पा कोते, माजी मार्केट कमिटी सदस्य श्री बापूसाहेब पा.लहारे, गणेश कारखान्याचे संचालक श्री आलेशजी कापसे, विष्णुपंत शेळके पा, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठलराव पा शेळके, माजी सरपंच श्री संपतकाका लहारे पा, तंटामुक्ती अध्यक्ष श्री दिलीपभाऊ लहारे पा, श्री संदीपभाऊ लहारे पा, श्री बी.एल.आहेर सर, श्री भाऊसाहेब दादा लहारे पा, श्री निलेश लहारे पा, श्री धनंजय भालेराव पा, श्री नामदेव गोरे पा,श्री कैलासभाऊ आहेर, श्री दिलीप भालेराव, राहुल भालेराव आदि पदाधिकारी व वाकडी ग्रामस्थ यावेळी सदर निवेदन देण्यासाठी उपस्थित होते....

Post a Comment

0 Comments