भोकर येथे मुलीचा विनयभंग प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी…



टाकळीभान( प्रतिनिधी - )
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी येथील एका युवकासह त्याच्या वडील व आई यांच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 एका अल्पवयीन मुलीस भोकर येथील आमीर आजीज शेख याने सन २०२१ पासून ते दि.०३ जानेवारी २०२५ पर्यंत ती अल्पवयीन आहे. हे -माहीत असतांना देखील आमीष दाखवून मोटार सायकलवर फिरविले व तिचा फोटो व व्हीडीओ इन्स्टाग्रामवर टाकून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच आजीज बबन शेख व सलमा आजीज शेख,दोघे राहणार भोकर यांनी सदर मुलगी वयाने लहान आहे हे माहीत असताना देखील मुलीला आमिष दाखवून अमीर यास सदरचे कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले असे फिर्यादीत म्हटले आहे. 

      याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा कलम १२,१७ सह अ. जा. ज. अ. प्र. कायदा कलम ३(१), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून सदर प्रकरणी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे करत असून त्यांना पो. नि. दशरथ चौधरी सहकार्य करत आहे.

Post a Comment

0 Comments