टाकळीभान जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

टाकळीभान प्रतिनिधी - टाकळीभ येथे जिल्हा परिषद केंद्र शाळा, टाकळीभान मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
      यानिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या शैक्षणिक कार्यावर आधारित भाषणे केली . काही विद्यार्थी सावित्रीबाईची सुंदर वेशभूषा करून आलेले होते.  शिक्षकांनीही आपल्या भाषणातून सावित्रीबाईच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून  दिली.
     या कार्यक्रमाला काही महिला पालकही उपस्थित होत्या. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री अनिल कडू, शिक्षक शिवाजी पटारे, कुमार कानडे, यशवंत गागरे, राजेंद्र बनकर शिक्षिका सुनीता जाधव, उज्वला पाचरणे, जया चव्हाण, उज्वला शेळके, ज्योती गावडे विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments