शिर्डी (प्रतिनिधी)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी सहकुटुंब श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी त्यांचा शाल प्रसाद देऊन सत्कार केला.
व्यंकटेश प्रसाद, हे भारतीय क्रिकेट, कन्नड समालोचक, प्रशिक्षक आणि माजी व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने 1994 मध्ये पदार्पण केले. प्रामुख्याने उजव्या हाताचा मध्यम-वेगवान गोलंदाजी साठी प्रसिद्ध होता.
व्यंकटेश प्रसाद साई भक्त असून यापूर्वी शिर्डीला ते साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले आहेत.
0 Comments