सावळीविहीर येथे धर्मनाथ बीज विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी!

शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील गावामध्ये श्री मोठेबाबानाथ येथे धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

  येथील श्री मोठेबाबानाथ मंदिरामध्ये सकाळी 
जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा संजय विठ्ठल गडकरी व सुनंदा संजय गडकरी यांनी केली. श्री नवनाथ भक्तिसार मधील ३४ वा अध्याय राजेंद्र गडकरी यांनी वाचला.  त्यानंतर दुपारी महिला भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठ व भजन गाथा झाली. त्यामध्ये बेबीताई सोनवणे, पद्माताई कापसे, जिजाबाई पवार, कामठे मावशी, सौ सविता चव्हाण, सौ फाजगे मावशी, सांगळे मावशी, जपे मावशी, सौ गायकवाड वहिनी, सौ सुनीता गोकुळ जपे, सौ सुमनताई जाधव,सौ.कासवे ताई, वाघ मावशी, श्रीमती गवळी मावशी, आगलावे ताई, सौ पवार मावशी, सुमनताई विघे, श्रीमती रेगवडे ताई,आदी महिला यावेळी उपस्थित होत्या.त्यानंतर महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.
दरवर्षी धर्मनाथ बीज या दिवशी हा कार्यक्रम येथे होत असतो. कै. भाऊसाहेब पा. जपे,कै. विठ्ठल मनाजी गडकरी, तसेच कैलासराव जपे , सतीश आगलावे, आदींनी हा धर्मनाथ चा उत्सव  सुरू केला . तो आजतागायत दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.धर्मनाथ बीज निमित्त मंदिरामध्ये सजावट करण्यात आली होती. धर्मनाथ बीज साजरी करण्यासाठी अनेकांनी मोठे परिश्रम घेतले. महिला भजनी मंडळाचे मोठे योगदान होते. तसेच गावातील बाळासाहेब काशीद, रवी कापसे, मनोज वाघ, संतोष पळसे, विक्रम आगलावे, शिवाजी आगलावे ,सुनील आगलावे, राजेंद्र सोपानराव आगलावे, रामदास आगलावे, रावसाहेब आगलावे, पोपट जपे ,शरद जपे, संजय वाघमारे, दिलीप कापसे, राजू भुसे, पत्रकार हेमंत शेजवळ, राजू दुनबळे, राजू फाजगे, सागर जाधव, विजय चव्हाण, सोपानराव जपे, डांगे पाटील, सुधीर कामठे, प्रमोद कोपरे, चंद्रकांत जपे, विवेक जपे शरद जपे सर, भारत नेतकर, मनोज बिडवे ,योगेश पाचोरे, मनोज जपे, करण जपे, सतीश जपे, प्रीतम कापसे, महादेव शिंदे, सोनू गोकुळ जपे, पैठणे सर , रवींद्र पळसे, संजू आरणे,रवींद्र गडकरी, सविता जेडगुले, अमोल भडांगे, सागर जपे , अमोल कोठारी, नंदू गायकवाड, आदींनी  मोठे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक, महिला, युवक ,उपस्थित होते. या कार्यक्रमाला श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत आत्माराम गिरीजी महाराज, ह भ प संजयजी  महाराज जगताप यांनीही शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments