टाकळीभान प्रतिनिधी :नुकत्याच झालेल्या राज्य अंतर्गत कबड्डी स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५१ वी कुमार व कुमारी राज्य गट अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये
आझाद क्रीडा मंडळचा खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे.
उत्तराखंड येथे होणाऱ्या अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
५०वी कुमार ,कुमारी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जयंत काळे महाराष्ट्र संघामध्ये खेळणार आहे. बाळासाहेब हरिभाऊ काळे यांचे चिरंजीव असलेल्या कबड्डी खेळाडू जयंत बाळासाहेब काळे याची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल त्यास मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक रवींद्र गाढे, व्यवस्थापक अक्षय थोरात व सर्व आझाद क्रीडा मंडळाचे खेळाडू, क्रीडाप्रेमी व टाकळीभान येथील मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी काळे याचे निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक केले आहे.
0 Comments