लोहगाव (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील मिरपूर येथील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री डॉक्टर घनश्याम भारस्कर यांचा आज तीन जानेवारी 2025 गुरवारी साजरा करण्यात आला असून वाढदिवसानिमित्त अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मीडियावर व मोबाईलवर त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो. डोंगरदऱ्यांच्या अडचणीतून मार्ग काढत असतो.प्रत्येक दिवस नवा अनुभव,आंनद घेऊन येतोच, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. कि,तो दिवस आनंदाबरोबर, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो. नवीन संकल्प घेऊन येतो.
वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा दिवस असतो. हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो. व सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत व त्यामुळे मिळणारी ऊर्जा अंगीकारत पुढील वर्षाच्या नवीन संकल्पा साठी सज्ज होणारा हा दिवस असतो. म्हणूनच या वाढ दिवसाला प्रत्येकाच्या जीवनातील आनंददायी दिवस संबोधला जातो. अशा या आनंददायी वाढदिवसी संजू भाऊ यांना सर्व क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
श्री घनश्याम भारस्कर रा. मिरपूर तालुका संगमनेर
जिल्हा अहिल्यानगर येथील एक प्रसिद्ध असे उद्योजक असून ते आपल्या व्यवसाया बरोबरच सामाजिक कार्यातही नेहमी सक्रिय असतात. सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग असतो
.मग श्री आवजिनाथ माहाराज असो, की गावातील धार्मिक कार्यक्रम यात्रा असो की गणेश उत्सव ,नवरात्र उत्सव असो, त्यामध्ये त्यांचा खारीचा का होईना वाटा असतो . डॉ. की बरोबर अनेक उद्योग व्यवसाय त्यांच्या आहे. तरुण त्यांचा आदर्श घ्यावा असे त्यांचे कार्य आहे
श्री साईबाबांच्या ते भक्त असून ते स्वतः हाताने आकर्षक असा पुष्पहार बनवून . ते सेवा करतात दर गुरुवारी ते शिर्डी येथे जाऊन दर्शन घेतात.
तर ते मूर्तीला स्वतः हाताने आकर्षक असा पुष्पहार बनवून अर्पण करत असतात. शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेकदा मिरपूर ते वणी सप्तशृंगी गड पदयात्रा तसेच सायकल यात्राही केलेली आहे. त्यांना क्रीडा क्षेत्रातही मोठी आवड आहे.ते उत्कृष्ट कबड्डीपटू असून शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध ठिकाणी जिल्हा, राज्य पातळीवर, कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेऊन सांघिक पारितोषिके पटकावले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण व महाविद्यालय शिक्षण कोपरगाव , नाशिक येथे झाल्यानंतर पदवीधर असताना नोकरीच्या मागे न लागता सराफी दुकान टाकून त्यामध्ये चांगले यश संपादन केले आहे. प्रमाणिकपणे आपला व्यवसाय करत असताना तसेच सामाजिक कार्य करत असताना आपले कुटुंबही सुसंस्कृत व सुशिक्षित असे केले आहे. आपल्या सुविध्य पत्नीचेही मोठे सहकार्य मिळत गेले.साथ राहिलीभारस्कर कुटुंबामध्ये मोठे असल्यामुळे भाऊ-बहीण व कुटुंबातील सर्वांना चांगले संस्कार दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा शांत संयमी व सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव यामुळे ते सर्व परिचित आहेत. मोठा मित्रपरिवार राज्यात व परराज्यातही त्यांनी आपल्या वागणुकीमुळे मिळवला आहे. त्यामुळेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचेवर सर्व क्षेत्रातून ,मित्र परिवारातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सत्तेचा महासंग्राम न्युज परिवाराच्या वतीनेही घनश्याम भारस्कर यांना जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव मिळो. ! तुमचं जीवन अनंत सुख आणि प्रेमाने भरलेलं असो, आणि तुम्ही सदैव हसत आणि आनंदी राहो! वाढदिवसाच्या खूप खूप सदिच्छा आहेत व त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या ही खूप खूप शुभेच्छा आहेत.
0 Comments