सोयगाव जि. प. शाळेच्या माजी विध्यार्थ्यांचे 38 वर्षानंतर स्नेहसंमेलन संपन्न,गुणवंत विध्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे दिले वचन--



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगांव, दि. 20 -  येथील जि. प. प्रशाला माध्यमिक शाळेची आणि आपल्या तात्कालीन हयात, तसेच दिवंगत गुरुजनांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शाळेच्या सन 1987  सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे दि.19 रविवारी रोजी 'कृतज्ञता स्नेहसंमेलन" उत्साहात संपन्न झाले. 

      सोयगाव जि प प्रशाळेतील 1987 च्या दहावीच्या सुमारे 80 माजी विद्यार्थ्यांचा हा वर्ग तब्बल 38 वर्षांनी पुन्हा एकदा किलबिलाटासह गजबजला. सन 1987 नंतर दहावीतून बाहेर पडून, महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरी, उद्योगानिमित्ताने देश आणि राज्यभर विखूरलेल्या या बॅचचे विद्यार्थी  प्रदीर्घ काळानंतर परस्परांच्या स्नेहभेटीसाठी सोयगावात एकवटले होते!

     सोयगांव येथील जि. प. प्रशाला शाळेतील ज्या वर्गात दहावीचे धडे गिरवले त्या वर्गात रविवारी 10 वाजता शाळेची घंटा वाजवून सर्व माजी विद्यार्थी वर्गात बसले.  शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थीप्रीय शिक्षक श्री. टी. के. शेळके सर,लक्ष्मण रोकडे व व्ही.एस. वाणी सर यांनी पुन्हा एकदा या माजी विध्यार्थ्यांचा वर्ग घेऊन, सर्वांना त्यांनी आशीर्वाद दिले. पुन्हा घंटा वाजून हा वर्ग सुटला. त्यानंतर अगस्ती मुनी संस्था आमखेडा येथे  स्नेहसंमेलनाचा मुख्य कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शाळेचे माजी मुख्याध्यापक एल. एस. रोकडे सर तर टी.के. शेळके,डी. सी.पाटील,व्ही.एस. वाणी,ए. ए. महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. वर्गमित्र मैत्रिणींचा परिचय घेत सर्वांनी मनोगत व्यक्त केले. स्नेहसंमेलनास उपस्थित मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.दरम्यान उपस्थित सर्व वर्गमित्रांना व मैत्रिणींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विध्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीत जनरल मॅनेजर असलेले भाऊसाहेब डी. पाटील यांनी पुन्हा शाळा भरविण्यासाठी पुढाकार घेतला. भगवान वाघ,अनिल चौधरी, संजय बावस्कर, सरला महानोर,हरिदास काटोले, गोपाल राजपूत,निकेश बिर्ला,निवृत्ती पाटील,डॉ.सुनील पाटील,राजू काळे,मनीषा सोनवणे, संगीता सोनार,उषा राठोड,माधुरी दुसाने,सुधाकर सोहनी,संजय वामने,अर्जुन पाटील अश्या सर्व वर्गमित्रांनी अतोनात परिश्रम घेत हे संमेलन यशस्वी केले. संमेलनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय बावस्कर यांनी तर आभार प्रदर्शन हरिदास काटोले यांनी केले.


Post a Comment

0 Comments