आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांचा 193 वा बलिदान दिन 3 फेब्रुवारीला श्रीक्षेत्र जेजुरी गडावर विविध कार्यक्रमांनी होणार साजरा!प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांची विशेष उपस्थिती --- नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे युवा अध्यक्ष-- हर्षवर्धन चव्हाण

शिर्डी (प्रतिनिधी)
आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी राजे नाईक यांचा 193 वा बलिदान दिन 3 फेब्रुवारी 2025 रोजी  श्रीक्षेत्र जेजुरी येथे अभिवादन करत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

  क्रांतिकारी रामोशी ( बेरड बेडर वाल्मिकी तलवार) समाजाचे राज्यव्यापी प्रतिनिधित्व करणाऱ्या नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तीन फेब्रुवारी 2025 रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव करणारे व इंग्रजांना 14 वर्षे सळो की पळो करून सोडणारे आणि देशासाठी प्रथम फासावर जाणारे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा 193 वा बलिदान दिन असून तो श्रीक्षेत्र जेजुरी गडावर अभिवादन कार्यक्रम करत साजरा करण्यात येणार आहे. 

श्रीक्षेत्र जेजुरी गडावरील राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाजवळ 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा उधळून  मान्यवरांच्या हस्ते पुष्पहारअर्पण करत अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक व इतिहासकार डॉक्टर श्रीमंत कोकाटे तसेच  पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे अध्यक्षा कविताताई म्हेत्रे या राहणार आहेत. त्यांचे राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान होणार आहे.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे प्रांतअध्यक्ष वसंतराव चव्हाण हे राहणार आहेत. तर या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, श्री.मार्तंड देवस्थान जेजुरीचे  प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते व सर्व विश्वस्त तसेच राहुरीचे डॉक्टर दौलत जाधव, जयदीप बारभाई ,डॉक्टर रवी किरण नाईक ,बाळासाहेब मसगुडे व मुख्य लेखापरीक्षक संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच संघटनेचे राज्य पदाधिकारी राजकुमार गडकरी , देवराम गुळवे, जगन्नाथ माकर, विश्वनाथ मचकुले, बाळेश नाईक, कालिदास ( बंडू) बोडरे, सुरेश मंडले, सतीश कुमार पाटोळे ,सौ मुक्ता चव्हाण, डॉक्टर अरुधंती नाईक, आदींसह सर्व राज्य
पदाधिकारी ,जिल्हाध्यक्ष व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्या राज्यकारणीची  आद्यक्रांतिवीर‌ राजे उमाजी नाईक सभागृहात  विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. तरी या कार्यक्रमांना संघटनेच्या सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते आणि राजे उमाजी नाईक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष हर्षवर्धन वसंतराव चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments