केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांची 12 जानेवारीला शनिशिंगणापूर व शिर्डीला भेट!

शिर्डी (प्रतिनिधी)
 केंद्रीय गृह व सहकार मंत्री नामदार अमित शहा हे 12 जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर दौऱ्यावर येत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी तीन वाजता मालेगाव नाशिक येथून हेलिकॉप्टरने शनिशिंगणापूर तालुका नेवासा येथे प्रयाण करणार आहेत. शनिशिंगणापूर हेलिपॅड येथे पावणेचार वाजता आगमन होणार असून मोटारीने श्री शनि देवाच्या मंदिराकडे प्रयाण करून तेथे श्री शनि दर्शन घेणार आहेत .त्यानंतर शनिशिंगणापूर येथून हेलिकॉप्टरने दुपारी पाच वाजेच्या दरम्यान शिर्डीला साईबाबा संस्थानच्या हेलिपॅड वर आगमन होणार आहे व तेथून मोटारीने श्री साईबाबा मंदिराकडे ते प्रयाण करणार असून श्री साईबाबांचे दर्शन ते घेणार आहेत. त्यानंतर हॉटेल सन अँड संन्ड शिर्डी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे .त्या बैठकीला ते उपस्थित राहून त्यानंतर मोटारीने काकडी विमानतळ येथे येऊन विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री शनिशिंगणापूर व शिर्डी दौऱ्यावर येत असल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात सुरक्षेच्या दृष्टीने या कालावधीत मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे. शिर्डी येथे 12 जानेवारी 2025 रोजी भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यातील सर्व भाजपाचे मंत्री, पदाधिकारी शिर्डीत येणार असल्यामुळे सुरक्षेसाठी शिर्डीतही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

Post a Comment

0 Comments