संस्कार संपदा व गुरुकुल संपदा कोल्हारमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या




 लोहगाव (प्रतिनिधी)गुरुकुल संपदा स्कूल  शाळेमध्ये दिनांक ८जानेवारी ते १० जानेवारी यामागील तीन दिवसापासून वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा उत्सवात मुलांच्या शैक्षणिक विकासासोबत क्रीडात्मक विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन केलेले होते. स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळ्यासाठी लोणी येथील ए. पी.आय माननीय श्री.कैलास वाघ आणि कोल्हार चे माजी सरपंच ॲड . संपतराव खर्डे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभ दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख विद्यालयाचे प्राचार्य सुधीर आहेर सर यांनी करून दिली . याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ए .पी .आय कैलास वाघ आणि ॲड . संपतराव खर्डे पाटील यांनी खेळाचे महत्व व खेळाबद्दल मार्गदर्शन केले. मैदानावरील कसरतीचे खेळ व नियमित व्यायाम हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे . हे त्यांनी पटवून दिले. त्यानंतर स्कूलच्या डायरेक्टर सौ सारिका आहेर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले त्यानंतर परेड संचालन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली . कार्यक्रमाचा  विद्यार्थ्यांनी मशाल प्रकाश उत्सव सोहळ्याबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थ्यांनी एरोबिक्स नृत्य व प्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. त्यानंतर क्रिडा महोत्सवाला सुरुवात झाली . प्रीस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चॉकलेट इटिंग ,कॅडबरी इटिंग,बॉल पिकअप आणि ड्रॉप या गेम प्री स्कूल साठी आयोजित केले होत्या. तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बॉटल गेम, हडल रेस ,रनिंग रेस आयोजित केली होती. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर हाऊस स्पर्धा आयोजित केल्या होत्या . त्यामध्ये  50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर, रिलेचे आयोजन केले होते व पालकांनी या क्रीडा महोत्सवाचा आनंद घ्यावा यासाठी पालकांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी मानसी निबे मॅडम यांनी केले. क्रीडा शिक्षक शकील पठाण यांचे मुलांना  मार्गदर्शन लाभले . तसेच सर्व शिक्षक वृंद ,विद्यार्थी यांनी क्रीडा महोत्सव उत्साहात सहभाग घेतला . अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला .

Post a Comment

0 Comments