राहाता तालुका गणित व विज्ञान प्रदर्शन, प्राध्यापक व कलाध्यापक संघटना यांच्या वतीने कृतिशील कलाशिक्षिका पुरस्काराने सौ. अनिता बाळासाहेब शिंदे सन्मानित!

शिर्डी (प्रतिनिधी)अहिल्यानगर जिल्हा परिषद, पंचायत समिती राहाता आणि राहाता तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघटना व राहाता तालुका कलाध्यापक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राहाता तालुका गणित-विज्ञान व पर्यावरण प्रदर्शन २०२५ श्री छत्रपती शिवाजी विद्यालय. (प्राथ. माध्य. उच्च माध्य.) पाथरे. ता. राहाता यांचे वतीने २०२४-२५ या शै. वर्षाकरीता सौ. अनिता बाळासाहेब शिंदे यांना मा. जि.प. अध्यक्षा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे भूषण सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते कृतिशील कला शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

सोमैया विद्या विहार मुंबई, जीबीएल साकरवाडी चे संचालक मा. सुहासजी गोडगे, मुख्याध्यापक श्री मारुती धायतडक, लक्ष्मीवाडी विद्यालयाचे पालक या सर्वांच्या वतीने सौ शिंदे अनिता यांचे अभिनंदन केले. सावळी विहीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील श्री शिंदे यांच्या त्या पत्नी आहेत.

Post a Comment

0 Comments