जेजुरी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आले असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी रामोशी, बेरड, बेडर समाजाचे आधारवड मार्गदर्शक, प्रेरणास्थान
मा.ना.देवेंद्रजी फडणवीस व सर्वांचा देवा भाऊ यांची निवड झाल्याबद्दल सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र जेजुरी गडावर एक टन भंडाऱ्याची उधळण करत केलेल्या नवसाची दौलत नाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली
जय मल्हार क्रांती संघटनेने मोठ्या उत्साहात पुर्ती केली. जय उमाजी ,जय मल्हार अशा घोषणा देत जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात रुद्रमहाअभिषेक केला व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. हजारो रामोशी, बेरड, बेडर व बहुजन समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थित होते.
0 Comments