शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सातव्यांदा विधानसभेवर निवडून आलेले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना नुकतेच जलसंपादन खाते मिळाल्यानंतर त्यांचा राहाता तालुक्यातील लोणी येथील जनसेवा कार्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. अनेक गावातील कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून यावेळी सत्कार करण्यात येत होता. नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः उभे राहून सत्कार स्वीकारत होते. प्रत्येकाची मोकळेपणाने चौकशी करत होते.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे, संजय मातेरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे, सागर आरणे, राजेंद्र कापसे, स्वप्निल पारडे, विनोद आरणे, पत्रकार राजकुमार गडकरी ,राजू दुनबळे, सागर पवार, आदींनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व नामदार विखे पाटील यांचे अभिनंदन केले. इतर गावातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही लोणी येथे जाऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॅबिनेट मंत्री व जनसंपादन खाते मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व अभिनंदन करण्यात आले. नामदार विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या सत्काराचा आनंदाने सत्कार स्वीकारला. यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय असो अशा घोषणाही देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अनेक कार्यकर्ते पदाधिकारी येथे सत्कारासाठी आले होते. मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा यावेळी सत्कार केला. शिर्डी मतदार संघा बरोबरच अहिल्या नगर जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत .असे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments