शिर्डीच्या साई संस्थांनला यावर्षी साईभक्तांनी भरभरून दिले दान!देणगीत 419 कोटींची झाली वाढ!

शिर्डी (प्रतिनिधी) संपूर्ण जगामध्ये सर्व धर्म समभाव आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीला साई दर्शनासाठी मोठ्या संख्येने साईभक्त दररोज येत असतात. सण उत्सव सुट्टीच्या कालावधीत तर ही संख्या लाखोंच्या आसपास जाते.साई दर्शनानंतर श्रद्धेने साईना देणगी स्वरूपात रोख रक्कम किंवा वेगवेगळ्या वस्तू स्वरूपात साई भक्त मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात.

 दिवसेंदिवस शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांची संख्या वाढत आहे व  साईसंस्थांनला साई भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. श्री.साईच्या दर्शनासाठी शिर्डीत वर्षाला कोट्यवधी भाविक येतात. दानपेटीत भक्त सोने, चांदी, हिरे  रोख रक्कम ,नाणी ,टाकतात .तर काही जण गुप्त दान करतात. मागिल वर्षात साईसंस्थानला ८१९ कोटी उत्पन्न मिळाले होते. गुंतवणूक तर २९१६ कोटी पर्यंत पोहचली आहे.मागील वर्षापेक्षा ४१९ कोटीची वाढ झाली आहे. या देणगी रकमेतूनच साई संस्थान साईभक्त भाविकांना भोजन चहा पान नाष्टा निवास आरोग्य सुविधा देते . इतर सुविधा, कर्मचाऱ्यांचा पगार देते.३१ मार्च २४ अखेर २९१६ कोटीची गुंतवणूक साईबाबा संस्थानने केली आहे. साईभक्त भाविकांना चागली सेवा सुविधा मिळत असल्यामुळे साईभक्त ही शिर्डीत साईंच्या दानपेटीत मोठे दान देत आहेत . व ते दिवसेंदिवस वाढत आहे.
३१ मार्च २४ अखेर २९१६ कोटीची गुंतवणूक , मार्च २०२४ वर्षात दानपेटीत १७६ कोटीचे दान, सर्वसाधारण देणगी १२१ कोटी प्राप्त , सोने चांदी मौल्यवान खडे दानपेटीत मिळाले मुल्य ११ कोटी अन्नदान निधी ९६ कोटी, रुग्णालयासाठी ५४ कोटी, प्रसादालय ४६ कोटी, इमारत दुरुस्ती ३२ कोटी, वस्तू स्वरूपात ८ कोटी, असे ८१९ कोटीचे उत्पन्न मिळाले तसेच २९१६ कोटीच्या गुंतवणूकी वरील व्याज २०० कोटी याचा समावेश आहे. भविष्यात आणखी सुविधा साईबाबा संस्थान देणार आहे. श्री साई मुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झालेल्या शिर्डीला साई संस्थान वेगवेगळे उपक्रम राबवत, साई भक्तांना सेवा सुविधा पुरवत आहे. त्यामुळे साई संस्थांनला देणगीही वाढत आहे व देशांमध्ये तिरुपती नंतर शिर्डीचे साई संस्थान हे श्रीमंत देवस्थान बनले आहे.

Post a Comment

0 Comments