पत्रकार राजेंद्र दुनबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात होत आहे साजरा!

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर येथील पत्रकार राजेंद्र दुनबळे यांचा आज मंगळवार 3 डिसेंबर 2024 रोजी वाढदिवस असून हा त्यांचा  वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात व त्यांचे अभिनंदन करत साजरा करण्यात येत आहे.
पत्रकार राजेंद्र दुनबळे हे सावळीविहीर येथील सामाजिक कार्यातही नेहमी सक्रिय असतात. सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य सुरू असते. पोर्टल, वृत्तपत्रे यामधून पत्रकारिता करता करता त्यातून समाजाचे प्रश्न, समस्या कशा मार्गे लागतील याकडे त्यांचे नेहमी लक्ष असते. शांत व स्पष्ट स्वभावामुळे ते सर्व परिचित आहेत. अशा सर्व परिचित असणाऱ्या तरुण पत्रकार मित्र राजेंद्र दुनबळे यांचा वाढदिवस सावळीविहीर  व परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटून सोशल मीडियावर फोन द्वारे त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात येत आहे. त्यांना दैनिक छत्रपती एक्सप्रेस परिवाराच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहेत.

Post a Comment

0 Comments