प्रतिष्ठित जांभेकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांचा प्रवरा परिसर छायाचित्रकारांच्या वतीने सन्मान!

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील लोहगाव ( प्रवरानगर) येथील जेष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांना
 भारतीय लहुजी सेनेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित व मानाचा असा जांभेकर समाजभूषण पुरस्कार नुकताच  श्रीरामपूर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या जन्मोत्सव सोहळा दिनी 30 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदान करण्यात आला.
 
हा मानाचा व प्रतिष्ठित जांभेकर समाज भूषण पुरस्कार कोंडीराम नेहे यांना प्रदान करण्यात आल्याबद्दल  त्यांचे सपत्नीक लोणी प्रवरानगर परिसरातील छायाचित्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पत्रकार विजय बोडखे, अनिल बेंद्रे ,दिलीप धावणे, आदी उपस्थित होते. यावेळी विजय बोडखे यांनी भारतीय लहुजी सेनेचा मानाचा जांभेकर समाजभूषण पुरस्कार आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांना मिळाल्याबद्दल हा सर्व प्रवरा प्रेस क्लबच्या  सदस्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे .आम्हालाही त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मोठा अभिमान आनंद आहे. प्रवरा प्रेस क्लब व छायाचित्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन आहे .असे सांगितले. 
यावेळी कोंडीराम नेहे यांनी पत्रकार व छायाचित्रकारांनी माझा जो सन्मान केला .अभिनंदन केले त्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

0 Comments