इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो मात्र जय आणि पराजय यासाठी जो संघर्ष होतो. त्या संघर्षात सुद्धां दम असावा लागतो-पोलीस अधीक्षक राकेश ओला…



अहिल्यानगर (प्रतिनिधी) 
प्रत्येक खेळात आणि जीवनात जय पराजय हा अविभाज्य भाग आहे. पण त्यासाठी संघर्ष करणे महत्त्वाचे आहे.इतिहास विजयाप्रमाणेच पराभवाची सुद्धा नोंद घेत असतो.पण त्यासाठी केलेल्या संघर्षात दम असावा लागतो. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी नगर एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांच्या संयुक्त खेळ मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याबाबत बोलताना पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला पुढे म्हणाले की,खेळाकडे फक्त स्पर्धा व मनोरंजन म्हणून पाहू नका,खेळातून यशस्वी नागरिक घडण्याची पायाभरणी होत असते,शाळा म्हणजे फक्त अभ्यासाचे केंद्र नसून मुलांमध्ये सर्व गुणांचा पाया रुजवणारे मंदिर आहे.यावेळी राकेश ओला यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांकडून, खेळाडूंकडून जोरदार प्रतिसाद देण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाहक छाया फिरोदिया यांच्यासह सर्व शिक्षक मंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments