शिर्डी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापीही सस्पेन्स कायम असून मुख्यमंत्री कोण !अशी चर्चा सर्वत्र होत आहे. त्यामध्ये आता अहिल्या नगर जिल्हा वासियांनी अहिल्या नगर जिल्ह्याला या वेळेला मुख्यमंत्रीपद द्यावे .अशी जोरदार मागणी केली आहे.
अहिल्यानगर मधून महायुतीच्या दहा जागा निवडून आले आहेत. या जागा निवडून आणण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील व विखे परिवारांनी मोठे कष्ट घेतले आहे. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील हे मागील सरकारात महसूल मंत्री होते. विविध खाते त्यांनी सांभाळलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना 35 वर्षे सलग आमदार असल्यामुळे व मंत्री अनेक वर्ष असल्यामुळे राज्यातील शासकीय कामकाजांचा मोठा अनुभव आहे. राज्यात सर्वत्र त्यांचे विविध नेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे शिर्डीत व काही ठिकाणी राधाकृष्ण विखे भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्सही झळकत आहेत. त्यातच नव्याने भर म्हणून आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीतून आठव्यांदा निवडून आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री पद देऊन अहिल्यानगर जिल्ह्याला प्रथम मुख्यमंत्री पद देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा. अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातून सध्या जोर धरत आहे.
0 Comments