महेंद्र साळवे यांचे निधन.

टाकळीभान प्रतिनिधी- पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील महेंद्र यादवराव साळवे (वय ५६) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते परिसरात परिचित होते. पतसंस्था व बँकिंग क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटविला होता. तसेच शैक्षणिक संस्थांंचे दप्तर लिहिण्यातही त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्या मागे पत्नी सीमा, वैभव, विशाल, तुषार ही तीन मुले, सून कोमल, विवाहित कन्या सविता दिलीप पडवळ, नातू, मेहुणे असा मोठा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार मारूतीराव साळवे, जिल्हा सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी विजयानंद सदाशिव साळवे, सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी अजित माधवराव साळवे, पनवेल महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश साळवे यांचे महेंद्र साळवे हे चुलत बंधू होते. कान्हूरपठार येथील नालंदा बुद्ध विहारात गुरूवार दि. ६ डिसेंबर रोजी शोकसभा होणार आहे.

Post a Comment

0 Comments