राहाता तालुक्यातील निमगाव निघोज येथील प्रसिद्ध व पुरातन अशा श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी महोत्सव उत्साहात सुरू!श्री साईसतचरित्र पारायण व दररोज किर्तन आणि महाप्रसादाचा होत आहे कार्यक्रम!

शिर्डी (प्रतिनिधी)
 राहाता तालुक्यातील निमगाव (कोऱ्हाळे )येथील प्रसिद्ध व पुरातन अशा श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी महोत्सवा निमित्त श्री साई चरित्र पारायण, कीर्तन महोत्सव तसेच भजन, पूजन व महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात दररोज संपन्न होत  आहेत.
    राहता तालुक्यातील शिर्डी जवळील श्री निमगाव कोऱ्हाळे येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान हे पुरातन व प्रसिद्ध असे देवस्थान असून श्री साईबाबा सुद्धा या खंडोबा मंदिरात अधून मधून येत होते. असा उल्लेख आढळतो. असे प्रसिद्ध हे मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच करण्यात आला आहे व भव्य दिव्य असे आकर्षक नवीन मंदिर बनवण्यात आले आहे. येथील श्री खंडोबा मंदिर व परिसरात चंपाषष्टी महोत्सवा निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आठ दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. येथे शनिवार 30 नोव्हेंबर 2024 ते सात डिसेंबर 2024 या कालावधीत विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.
चंपाषष्ठी महोत्सवा निमित्त श्री खंडोबा महाराज मंदिरात सकाळी अभिषेक स्नान, काकडा आरती त्याचप्रमाणे सकाळी  सात ते अकरा या कालावधीतील श्री साई सत चरित्र पारायण अध्यायवाचन, तसेच आरती व सायंकाळी हरिपाठ व रात्री सात ते नऊ या कालावधीत दररोज जाहीर हरिकीर्तन होत आहे. व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. चंपाषष्ठी उत्सवा पर्यंत दररोज किर्तन महाप्रसाद होणार असून श्री चंपाषष्ठी महोत्सव निमित्त श्रीखंडोबा महाराज मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई मंडप तसेच सात डिसेंबर 2024 चंपसष्टीला सकाळी काल्याचे किर्तन होऊन वांग्याची भाजी व भाकरीचा, महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी येथे मोठी यात्रा भरणार आहे. या सर्व चंपाषष्ठी महोत्सवाचे आयोजन व्यवस्थित करण्यात आले असून सर्व कार्यक्रम व्यवस्थित संपन्न व्हावे यासाठी श्री खंडोबा महाराज देवस्थान ,विश्वस्त तसेच निमगाव‌निघोज ग्रामस्थ खंडोबा भक्त भाविक यासाठी परिश्रम घेत आहेत .

Post a Comment

0 Comments