सावळीविहिर येथिल न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी साजरा


     
शिर्डी ( प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील  सावळीविहीर बु येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात नुकताच जागतिक दिव्यांग दिन (सप्ताह) विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.तुपे सर आणि दिव्यांग विभाग प्रमुख श्री.खान सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व तसेच भेटवस्तू देऊन त्यांचे स्वागत मुख्याध्यापकांमार्फत करण्यात आले. 
तसेच दिव्यांग कर्मचारी श्री.खान आय. आय., श्री.वाकचौरे ए.ए. यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. दि. ४ रोजी ला सकाळी ठीक अकरा वाजता गावातून दिव्यांग दिनाविषयी तसेच दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध घोषणांद्वारे प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ,  उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. तुपे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. डुंबरे आर.ए. सर.सौ.डहाळेपी.डी. मॅडम, श्री.म्हस्के ए.जे. श्री.काळेगोरे एम.बी.श्री.खानआय.आय.,श्री.खेडकर बी.आर.,श्रीम.कानडे एम.पी.,सौ.भामरे एम.आर.,श्री.वाकचौरे ए.ए.,श्रीम.शिंदे एम.डी. यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments