श्रीक्षेत्र सावळीविहीर ते श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड पायी पदयात्रेचे सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत जगदंब प्रतिष्ठान तर्फे आयोजन!

शिर्डी (प्रतिनिधी )
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जगदंब प्रतिष्ठानच्यावतीने श्रीक्षेत्र सावळीविहीर ते श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड अशा पायी वणीपदयात्रेचे  दिनांक ६ डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
‌ राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सावळीविहिर ते सप्तशृंगी गड अशी पदयात्रा काढली जाते. 
यावर्षीही सहा डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता येथील मारुती मंदिरासमोर रथपूजन व  मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या पायी पदयात्रेला प्रारंभ होणार आहे.
ही वणी पायी पदयात्रा सहा डिसेंबर 2024 रोजी निघून झगडे फाटा ,कोळपेवाडी मार्गे रात्री चासनळी येथे जाऊन तेथे मुक्काम होणार आहे. तर सात डिसेंबर 2024 रोजी  देवगाव  नैताळे,  मार्गे रात्री उगाव येथे मुक्कामी जाणार आहे. तर आठ डिसेंबर २०२४ रोजी उगाव येथून पहाटे निघून रानवड, शिरवाडे वडनेर भैरव मार्गे रात्री बहादूरी येथे नर्मदेश्वर आश्रमात मुक्कामी जाणार आहे. तर 9 डिसेंबर 2024 रोजी येथून सकाळी ही पदयात्रा निघून संगमनेर ,गड पायथा इथून श्री सप्तशृंगी गडावर सायंकाळी पोहोचणार आहे. दिनांक दहा डिसेंबर 2024 रोजी श्री सप्तशृंगी मातेचे सकाळी दर्शन करून ही पदयात्रा परत सावळीविहीर येथे सायंकाळी पोहोचणार आहे. या पायी वणी पदयात्रेत सहभागी होणाऱ्यांनी जगदंबा प्रतिष्ठानचे सागर जपे यांच्याशी संपर्क करावा. जास्तीत जास्त पदयात्रींनी सहभागी व्हावे. असे आवाहन सागर जपे, ऋषी जपे,दीपक पवार, सौरभ पळसे, अक्षय चव्हाण, रामा थोरात, विशाल लकारे आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments