संगमनेर (प्रतिनिधी तालुक्यातील पठार भागातील वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये केंद्रस्तरीय विविध गुणदर्शशन स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक अध्यक्ष भाऊसाहेब पांडुरंग वर्पे होते.तसेच मंचावर समितीच्या उपाध्यक्षा सौ.कविता संपत भोसले,सागर रमेश शिंदे सुभाष गागरे,संतोष वर्पे,बापू गागरे साकूर गटाचे शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत, वरवंडी केंद्राचे केंद्रप्रमुख विनायक भोसले,इंद्रभान पावसे आदी उपस्थित होते.
यावेळी संगमनेर पठार भागाचे प्रमुख सागर शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय नंबर प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून व्यवस्थापन समितीकडून वह्या,पेन,पेन्सिल शालेय साहित्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
0 Comments