शिर्डी (सत्तेचा महासंग्राम न्युज)
आपल्या जन्माचे कारणीभूत व आपल्या अध्यात्मिक प्रगतीचे प्रारंभिक मार्गदर्शक हे आपले माता-पिता आहेत. त्यांची सेवा ही सर्व तीर्थांची सेवा केल्यासारखी आहे. असे सांगत श्राद्ध हा कर्मकांड आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्ती मिळण्यासाठी केला जातो. परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे केवळ या कर्मकांडापुरते सिमित न राहता आपल्या अंतकरणात भक्ती आणि सेवाभाव ठेवणे महत्त्वाचे आहे. ते संपूर्ण मानवतेच्या आणि पर्यावरणाच्या सेवेसाठी प्रेरणा देते.असे श्री नर्मदेश्वर सेवाधाम चे महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून निरूपण करताना सांगितले.
यावेळी हभप संजय महाराज जगताप (भऊरकर) हेही उपस्थित होते.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील धार्मिक व सामाजिक असे व्यक्तिमत्व असणारे कै. विठ्ठल मनाजी गडकरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजित प्रवचन सेवा देताना ते पुढे म्हणाले की,
सकल तीर्थाचे धुरे या ओवीचे महत्व आणि प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यावर सविस्तर प्रवचन करताना, आपल्याला या ओवीच्या संदर्भात ज्ञानेश्वरीतील अध्यात्मिक तत्त्वज्ञान समजून घेणे आवश्यक असून
ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सतराव्या अध्यायात भगवद्गीतेच्या कर्मयोगाच्या अध्यायात लिहिली आहे. तीर्थांचे धुरे म्हणजेच सर्व तीर्थांचे नेतृत्व, ते महत्वाचे स्थान आहे. जे आत्म्याला शुद्धी, मुक्ती, आणि मोक्षाचा मार्ग दाखवते. ‘जिये का मातापितरे’ म्हणजे आत्म्यासाठी माता-पिता हेच सर्वस्व आहेत, कारण ते आपल्याजन्माचे कारणभूत आहेत आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीचे प्रारंभिक मार्गदर्शकही आहेत. श्राद्ध हा कर्मकांड आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो. परंतु ज्ञानेश्वर माउलींच्या या ओवीतून आपल्याला हे समजते की, केवळ कर्मकांडापुरते सीमित न राहता आपल्या अंतःकरणात भक्ती आणि सेवाभाव ठेवणे महत्त्वाचे आहे. "त्या सेवेसि कीर शरीरे लोन कीजे" या ओवीच्या शेवटच्या ओळींमध्ये एक अति सुक्ष्म पण गहन तत्त्वज्ञान सांगितले आहे—आपण शरीराने आणि मनाने आपले कर्तव्य पार पाडताना सेवाभाव ठेवावा आणि ती सेवा ही अशा प्रकारे करावी की ती मधुर, प्रेमपूर्ण आणि आत्म्यातील लोण सारखी व्यापक असावी.
प्रथम वर्ष श्राद्धाचे वेळी ही ओवी म्हणजे एक प्रकारचे स्मरण असते की, आपण जे काही करतो ते केवळ कर्मकांड नसावे तर आत्म्याला पवित्रता आणि शांतता प्रदान करणारं, आत्मशुद्धीसाठी आणि आंतरिक जागृतीसाठी ते स्मरण असावं.ही भावना ध्यानात घेतली तर प्रत्येक श्राद्धकर्म हे केवळ आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मानवतेच्या आणि पर्यावरणाच्या सेवेसाठी प्रेरणा देते. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीच्या या ओवीच्या संदर्भाने प्रथम वर्ष श्राद्धाचे महत्व श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी यावेळी सांगितले. प्रवचनानंतर महंत आत्मारामगिरीजी महाराजांचा ह भ प विक्रम महाराज आगलावे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला व आशीर्वाद घेतले. तसेच यावेळी ह भ प संजय महाराज जगताप (भऊरकर) हेही उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले .या कार्यक्रमाला गडकरी कुटुंबातील सर्व सदस्य ,नातेवाईक, मित्रमंडळी, ग्रामस्थ ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments