शिर्डी विधानसभा मतदारसंघात चार उमेदवारांची माघारी! आता एकूण आठ उमेदवार रिंगणात!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी विधानसभा मतदारसंघात आज सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांची माघार झाली असून आता शिर्डी मतदार संघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज सोमवार अखेरचा दिवस होता. बंडखोरांच्या मनधरणीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले गेले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातही आज चार उमेदवारांनी माघार घेतली आहे.

 तुषार गणेश सदाफळ, ममता राजेंद्र पिपाडा ,जनार्धन चंद्रभान घोगरे ,शितोळे सुदर्शन लक्ष्मण ,या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे आता आठ  जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात आता महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील, महाविकास आघाडी कडून इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रभावती जनार्धन घोगरे, वंचित बहुजन आघाडीचे राजू सादिक शेख, भारत जोडो पार्टीचे मोहम्मद इसहाक इब्राहिम शहा, अपक्ष म्हणून डॉक्टर  राजेंद्र मदनलाल पिपाडा, अपक्ष मयूर संजय मुर्तडक, अपक्ष म्हणून रेश्मा अल्ताफ शेख, व अपक्ष म्हणून रामनाथ भाऊसाहेब सदाफळ या आठ उमेदवारांच्या अर्ज राहिले आहेत.
त्यामध्ये भाजपाचेच पण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा उमेदवारी अर्ज राहिला आहे. त्यामुळे शिर्डीत आता सध्या हीच चर्चा सुरू आहे.शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे जेष्ठनेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी पिपाडा यांना स्पेशल विमानाने बोलवून घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात त्यांची बंडखोरी कायम राहिली आहे.

Post a Comment

0 Comments