जगात अनेक तीर्थ आहेत, मात्र ज्या माय बापाने जन्म दिला,हे जग दाखवले ,त्यांच्यापेक्षा जगात दुसरे कोणते श्रेष्ठ तीर्थ स्थान नाही----ह.भ. प. संजय महाराज जगताप (भऊरकर)

शिर्डी ( कोंडीराम नेहे)
सकल तीर्थांची ये धुळे, एका माता पितळे ,तयास सेवेसी शरीर, लोन की जे ज्ञानेश्वरी! संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, या विश्वामध्ये अनेक तीर्थक्षेत्र, देवता, भिन्नभिन्न उपासना आहेत. पण आपल्याला ज्या माय बापाने जन्म दिला व हे जग दाखवले त्यांच्यापेक्षा जगात श्रेष्ठ तीर्थ दुसरे कोणते नाही . असे ह भ प संजय महाराज जगताप (भऊरकर) यांनी राहता तालुक्यातील सावळीविहीर  बु.येथे प्रवचनात निरूपण करताना सांगितले.

सावळीविहीर बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते कै. विठ्ठल मनाजी गडकरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजित येथील श्री हनुमान मंदिराच्या सभामंडपात प्रवचन रुपीसेवा करताना ते पुढे म्हणाले की,
आपल्या भारत देशामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. चारीधाम, बारा ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, त्रिस्थळी, आदी करून हजारो  तीर्थक्षेत्रे आहेत. जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र आहे. महायोग पीठ म्हणजेच भगवान पंढरीनाथ विठ्ठल पांडुरंग परमात्मा हा विटेवर उभा राहिला. पंढरपुरातील एक श्रेष्ठ मातृ-पितृभक्त संत पुंडलिक यांच्या आज्ञेने पांडुरंग परमात्मा विटेवर उभे राहिले, हे जगातले एक नंबरचे आदर्श उदाहरण आहे. मात्या पित्याची सेवा जर अनन्य भावनेने व श्रद्धेने केली तर सर्व तीर्थक्षेत्र घडल्यासारखे आहे. सेवा याचा प्रत्यक्ष परिचय म्हणजे भक्तराज पुंडलिक आहे. म्हणून मायबापाच्या सेवेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रत्यक्ष परब्रम्ह विठ्ठल पांडुरंग परमात्मा विटेवर आजही भक्तांना दर्शन देण्याकरता उभे आहेत. जसे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, जगामध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण सर्वात पवित्र आहे ते तीर्थक्षेत्र  कोणते असेल तर ते मायबाप आहेत. मायबाप केवळ काशी ,देणे न जावे तीर्थासी, असे म्हटले जाते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की, भारतीय संस्कृती मोठी व आध्यात्मिक आहे. अगोदर मातृदेवो भव, नंतर पितृ देवो, भव अतिथी देवो, भव आचार्य देवो भव आणि मग भगवंताची म्हणजे ईश्वराची उपासना सांगितलेली आहे. जसे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्र्यंबकेश्वर येथेच क्षेत्र आहे .तिथे महान तपस्वी गौतम ऋषी यांनी अवतार धारण केला पण त्यांच्याकडून गो हत्या घडली. त्या गो सत्तेच्या शापातून मुक्त होण्याकरता त्यांनी भगवान शंकराची उपासना ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन केली. त्या उपासनेतून भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि स्वतःच्या जटात धारण केलेली गंगा ,गौतम ऋषींना गो हत्तेच्या पापातून मुक्त होण्याकरता प्रगट केली. गौतम ऋषींचे निमित्त होऊन संपूर्ण जगाला गंगा गोदावरी महान तीर्थ निर्माण झाले. तीच गंगा गोदावरी ब्रह्मगिरी पर्वतावरून ब्रह्मगिरी च्या मध्यवर्ती गंगाद्वार या ठिकाणी प्रगट झाली. नंतर कुशावर्त या क्षेत्रामध्ये प्रगट झाली आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरी वरून गंगा गोदावरी नावाने प्रसिद्ध झाली. त्याच गंगा गोदावरी वर पहिले धरण गंगापूर धरण हे आहे. जसे शास्त्रामध्ये ब्रह्म हत्या गोहत्या बालहत्या असे अनेक महापापे सांगितलेले आहेत. त्या प्रत्येक पापाला प्रायक्षित्त वेगवेगळ्या पद्धतीने आहे . एकदा भगवान शंकराची स्तुती करताना ब्रह्मदेवाची चूक झाली. आणि ती अभद्रस्तुती त्यांच्याकडून केली.ती केली गेल्यामुळे ब्रह्मदेवाचे मस्तक भगवान शंकराने त्रिशूलने उडवले. नंतर भगवान शंकराला पश्चाताप झाला की, आपल्याकडून  ब्रह्म हत्या घडली. म्हणून भगवान शंकर एका टेकडीवर ध्यानस्थ बसून चिंतन करू लागले की, आता आपल्याला ब्रह्म हत्या घडलेली आहे. या पापाच्या प्रायचित्ता करता काय उपाय करावा, हे विचारत असतानाच  तिथे एक ब्राह्मण पती-पत्नी राहत होते. त्यांनी एक गोमाता आणि एक वासरू पाळलेले होते. गोमातेची सेवा ब्राह्मण देवता अगदी सुंदरपणे यथायोग्य करत होते आणि त्रिकाल संध्या करून वेदशास्त्राचे अखंड चिंतन करणारे चे ब्राह्मण देवता होते आणि त्यांनी ही पाळलेली गोमाता होती. तिला एक वचन म्हणजे वासरू होते .पण त्या गोमातेचे दूध काढल्यानंतर त्या वासरा करता पिण्याकरता जे दूध पाहिजे ते ब्राह्मण देवता शिल्लक ठेवतच नसे म्हणून एक दिवस गाई वासराचा संवाद चालला होता. वासरू गाईला म्हणाले अग आई माझी भूक भागण्याकरता तू तर दूध देते आणि हे ब्राह्मण देवता मला भुखे  ठेवता, तुझे काही दूध शिल्लक ठेवतच नाही .मग आता काय करावे, ब्राह्मण देवतेला तुझी दया येईल, असे काही दिवस निघून गेले ,तरी पण वासरू पाच सहा महिन्याचे झाले तरी पण दूध शिल्लक ठेवत नसल्यामुळे त्या वासराला राग आला आणि त्याने ब्राह्मण देवतेला  शिंगणे मारून थोडे पुढे ढकलले तोच ब्राह्मण देवता गत प्राण झाले आणि गोमाता हळहळ करू लागली व  बोलू लागली की अरे बाळ तू हे चांगले केले . एक तर या विश्वामध्ये ब्रह्म हत्या, गोहत्या, आणि बाल हत्या याला प्रायचित्त नाही आणि ती ब्रह्म हत्या तुझ्याकडून घडलेली आहे, काय उपाय करावा, लगेच वासराने सांगितले ,आई माझ्याबरोबर चल इथून जवळच पंचवटीत मोठे तीर्थक्षेत्र आहे. राम कुंड या ठिकाणी मोठे तीर्थ आहे. मोठा कुंभमेळा भरतो आणि त्या कुंडामध्ये अमृत कलश टेकलेला असल्यामुळे तिथे अमृताचे वास्तव्य आहे आणि 
त्या रामकुंड देवतांमध्ये स्नान केले की या सर्व पापातून मुक्तता होते असे वासरू त्या गाईला सांगत होते तेच दोघांचे विचार भगवान शंकर श्रवण करत होते त्यांनी दोघांचा तो विचार ऐकला आणि गाई वासराच्या पाठीमागे भगवान शंकर निघाले आणि रामकुंडावर आले. सुरुवातीला वासराने रामकुंडात स्नान केले. आणि स्नान करून दिव्य देह धारण केला. नंतर गाईने स्नान केले आणि दिव्य देय धारण केला. आणि त्यांच्या नंतर भगवान शंकराने स्नान केले. आणि भगवान शंकराला दोषातून मुक्त झाल्याचे समाधान मिळाले आणि लगतच रामकुंडाच्या बाजूस कपालेश्वर या नावाने ज्योतिर्लिंग रूपाने  ते स्थिर झाले. आणि तिथे ते वासरू आणि गाय दोघेही निकट भगवान शंकराचे जवळ आले. भगवान शंकराने त्या वासराला म्हणजे बाल नंदीला सांगितले की, इतर ठिकाणी तू नंदी म्हणून तू माझा सेवक आहेस. पण कपालेश्वर या देवतेसमोर पंचवटी मध्ये तू माझा सेवक म्हणून नाही तर तू माझा एक गुरु म्हणून आहेस म्हणून आजही कपालेश्वर या महादेवाचे दर्शन घेतले तर तिथे नंदी मंदिरासमोर दिसत नाही. असे तीर्थक्षेत्राचे व स्नानाचे महात्मे आहे .जसे आपण पंढरपूर या तीर्थक्षेत्र गेल्यानंतर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन  चंद्रभागेच्या घाटावरून महाद्वाराकडे येताना हनुमंत रायाचे मंदिर आहे .दक्षिणमुखी श्री हनुमान  मंदिराच्या समोर नंदी आहे. मग इतर ठिकाणी हनुमंत रायाचे जेवढे मंदिरे आहेत. तिथे समोर नंदी नाही. पण पंढरपुरामध्येच हा नंदी  का आहे तर त्यालाही एक इतिहास आहे. की ज्या वेळेला भगवान शंकर पांडुरंगाला भेटण्याकरता आले. त्यावेळेला भगवान शंकराने पद्मावती तळ्यावर पार्वती मातेला थांबण्यास सांगितले आणि महाद्वार चौकातील मारुती हनुमंताजवळ नंदीला थांबण्यास सांगितले आणि मंदिरात महाद्वारात दरवाजातून मध्ये गेले असताना दरवाज्याच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पाला थांबण्यास सांगितले आणि भगवान शंकर एकटेच पांडुरंगाला भेटण्याकरता गेले म्हणून एकमेकांनी एकमेकाला आलिंगन दिले आणि आलिंगन दिल्यानंतर भगवान पांडुरंग विठ्ठलाने भगवान शंकराला डोक्यावर धारण केले म्हणून भगवान  शंकराला पिंड रुपाने भगवान पांडुरंग विठ्ठलाने डोक्यावर धारण केले. आजही पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाच्या मूर्तीच्या डोक्यावर बघितल्यानंतर ती पिंड दिसते व अन्य कोणत्याही विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाच्या डोक्यावर पिंड दिसते. म्हणून असं असणारा हा एक अद्भुत पूर्व इतिहास आहे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, जगात अनेक तीर्थे आहेत .अनेक देव आहेत आणि अनेक देवतांची तीर्थाची उपासना अनेक ऋषीमुनी संतांनी केलेली आहे. अशी उपासना जरी असली तरी पण आपण ज्या माता-पित्यांच्या पोटी जन्माला आलो. त्यांचं असणारं पितृ ऋण, मातृ ऋण या ऋणातून मुक्त होण्याकरता बालकाने जन्मभर त्यांच्यावर आदरभाव भक्तीने श्रद्धा ठेवून त्यांची काय वाचा व  मनाने सेवा करावी. हेच त्या बालकाचे कर्तव्य आहे. माता पिता हेच सर्व तीर्थ आहे व त्यांची सेवा हीच सर्व मोठी सेवा आहे. असे आपल्या प्रवचनात निरूपण करताना त्यांनी सांगितले व  आज येथे सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी चांगले अशा तिथीला व तेही अनेक देव-देवतांच्या मंदिरासमोरील  सभामंडपात कै. विठ्ठल मनाजी गडकरी यांचे  प्रथम (पुण्यस्मरण )वर्ष श्राद्ध आहे. ते परमार्थिक क्षेत्रातील धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक असे व्यक्तिमत्व असणारे व  चार मुलांपैकी असणारे त्यांचे जेष्ठ चिरंजीव पत्रकार राजकुमार गडकरी  समाजामध्ये आणि सात्विक विचाराने त्यांचे जीवन आहे व सहज आणि समाजकार्य करता करता अखंड रात्रंदिवस त्यांचा ध्यास आहे व सदाचारी वृत्ती धारण करून वडिलांच्या विचाराचा आदर्श ते आज समाजामध्ये घेऊन चाललेले आहे. हि‌ एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. याप्रसंगी अनेक पत्रकार ,गावातील जेष्ठ पुढारी, मार्गदर्शक व सगे सोयरे, आप्तेष्ट बांधव उपस्थित होते व सर्वांच्या उपस्थितीमध्ये  ही प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजय महाराज जगताप (भऊरकर) यांचा  शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments