लोकांच्या सतर्कतेमुळे ऊसाला लागलेली आग विझवण्यात आली. परंतु दोन अडीच गुंठे ऊस जळून खाक.


लोहगाव (वार्ताहर) 
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील गट नंबर 118 मधील पत्रकार कोंडीराम परसराम नेहे यांच्या ऊसाला आग लागून दोन गुंठे ऊस जळून खाक. 


याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 3/11/ 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता ऊसाला अचानक आग लागली आग लागण्याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु आग ही फटाक्यामुळे  लागली असल्याचा अंदाज येतो.कारण की ऊस पिकाच्या क्षेत्रात वरुन कूठलीही विद्युत वाहक तार नाही. त्यामुळे शॉर्ट सर्किंटचा प्रश्नच उद्भवत नाही.दिड एकर ऊसाचे क्षेत्र नागरीकांच्या सतर्कतेमुळे वाचले.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याची अग्निशामक गाडी यावेळी नागरिकांनी बोलावून घेतली परंतु मोठ्या  प्रमाणात झालेले अतिक्रमणामुळे गाडी आत येण्यास विलंब लागला परंतु अग्निशामक वरील कर्मचारी व ड्रायव्हरच्या  सतर्कतेमुळे गाडी उसाच्या क्षेत्रा जवळ आणली व पाण्याच्या फवाऱ्यांनी आग आटोक्यात आली. 
लोक वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो या संबंधित  विभागाने  तातडीने अतिक्रमण मोहीम राबवून  अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी यावेळेस नागरिक करताना दिसत होते.
अतिक्रमणामुळे आजारी व्यक्तीचा प्राणही जाऊ शकतो.

 नागरिकांनी घरातील पाणी आणून आग विझवण्यात  प्रयत्न केला त्यामुळे मोठ्या  प्रमाणात अनर्थ टळला शेजारी उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे .वाऱ्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आग आटोक्यात आली. वाऱ्याचे प्रमाण असते तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असती.

Post a Comment

0 Comments