शिर्डी( प्रतिनिधी)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्तिक एकादशी निमित्त श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र आळंदी असा पायी दिंडी सोहळा कार्तिक पौर्णिमा शुक्रवार 15 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ह भ प संजयजी महाराज जगताप( भऊरकर) यांच्या
नेतृत्वाखाली व प्रमोद (दादा )मुरलीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून 15 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता श्रीक्षेत्र भऊर तालुका वैजापूर येथील श्री रोकडेश्वर महाराज मंदिरा पासून या दिंडी सोहळ्याला पूजन करून प्रस्थान होणार आहे.
कार्तिक पौर्णिमा शुक्रवार 15 नोव्हेंबर2024 रोजी पहिला मुक्काम पिंपळवाडी तालुका राहाता ,१६ला निमगाव जाळी तालुका संगमनेर, १७ नोव्हेंबरला पानोडी तर 18 नोव्हेंबरला बिरेवाडी ,19 रोजी खंदरमाळ ,वीस तारखेला आळेफाटा येथील खंडोबा मंदिरात तसेच 21 नोव्हेंबरला नारायणगाव ,22 नोव्हेंबरला वाकी बुद्रुक, 23 नोव्हेंबरला चाकण, 24 नोव्हेंबरला राजगुरुनगर, असा मजल दरमजल मुक्काम करत हा पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथे पोहोचणार आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे दिंडी विसाव्यचेठिकाण न्यू पेठकर धर्मशाळा, इंद्रायणी गार्डन येथे असणार आहे. दिंडी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ, भजन, प्रवचन व किर्तन सेवा होणार आहे. मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजे दरम्यान ह भ प संजयजी महाराज जगताप यांचे कीर्तन त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 ला सकाळी आठ ते दहा त्यांचेच काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. महाप्रसादाचे आयोजक प्रमोद दादा जगताप हे असणार आहेत. या दिंडी सोहळ्यात येणाऱ्या वारकऱ्यांनी बरोबर बिछाना सोबत आणावा. त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तू आणू नयेत. असेही पत्रकात म्हटले असून या दिंडी सोहळ्याचे दिंडी चालक ह भ प आप्पासाहेब मुके महाराज तसेच सह दिंडी चालक ह भ प बाळासाहेब जगताप, मच्छिंद्र जगताप ,भास्कर जगताप, विना पूजन हभप दादासाहेब जगन्नाथ जगताप, रथसेवा भऊरकर भजनी मंडळी, गाडी सेवा गुलाबराव शेळके, चोपदार हभप साईनाथ सोमवंशी, व अशोक बाबासाहेब मुके हे राहणार असून मृदंगाचार्य हभप काशिनाथ गंगाधर जगताप सखाराम माळी बाबा व चिरंजीव स्वागत मुके त्याचप्रमाणे विणेकरी म्हणून हभप भाऊसाहेब महाराज जगताप हे असणार आहेत. या दिंडी सोहळ्यामध्ये भजनी मंडळ, झेंडेकरी, तुलसी वृंदावनधारी महिला, वारकरी, गायनाचार्य व भाविक राहणार असून दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी संपर्क करण्याचे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केले आहे.
0 Comments