*महात्मा गांधी संकुलात वाचन प्रेरणा दिन साजरा*
लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकलात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नुकतेच वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. वैशाली म्हस्के तर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य अलका आहेर या उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी शाहिस्ता शेख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या काही संस्मरणीय आठवणी सांगून जीवनाचे जीवनातील वाचनाचे महत्त्व विशद केले.
तसेच सखी सावित्री समितीच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली म्हस्के यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रियंका लोंढे, सुवर्णा भोर, प्रतिभा ठोकळ यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार हिरा चौधरी यांनी मांडले. माध्यमिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्राचार्य अंगद काकडे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकातून खरे जीवनमूल्यांचे संस्कार होतात. विद्यार्थ्यांनी अशा संस्काराचे पाईक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, जवाहरलाल पांडे, शेजुळ सर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अश्विनी सोहोनी, रेणुका वर्पे आदींनी वाचन प्रेरणातून यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments