लोहगाव (कोंडीराम नेहे)
महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदार संघातील निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 ला एकाच टप्प्यात होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही निवडणूक जाहीर केली असून या निवडणूक घोषणेनंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २४ ला होणार असून निकाल हा २३ नोव्हेंरला लागणार आहे. महाराष्ट्रात एकूण मतदार ९.६३ कोटी मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ४.९७ कोटी इतकी आहे. तर ४.६६ कोटी या महिला मतदार आहेत. यात २०.९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम-
मतदानाची अधिसूचना – २२ ऑक्टोंबर २०२४ (गुरुवार) काढण्यात येणार असून
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – २९ ऑक्टोंबर २०२४ (गुरुवार) पर्यंत आहे.
उमेदवारी अर्ज छाननी तारीख – ३० ऑक्टोंबर २०२४ ( शुक्रवार) असून
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४ ( सोमवार) आहे.
मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४ ( बुधवारः) असून
मतमोजणीची तारीख – २३ नोव्हेंबर २०२४ (शनिवार) आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यामुळे आचारसंहिता ही लागू झाली आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष व विविध राजकीय नेत्यांमध्ये आता विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महिना ,सव्वा महिना आता राज्यामध्ये सर्वत्र निवडणुकीचे वारे वेगाने वाहणार असून सर्वजण निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करताना दिसून येत आहेत. निवडणूक तारीख घोषित झाल्यानंतर या चर्चांना अधिक उधान आले आहे.
0 Comments