शिर्डी (प्रतिनिधी) जमाना बदलत चालला आहे .त्याप्रमाणे जगही बदलत आहे.आजचे युग डिजिटल आहे. काळा बरोबर मीडिया ही बदलत आहे.अनेक प्रसार माध्यमे उपलब्ध असतानाही मुद्रित माध्यम न डगमगता स्थिर आहे. त्यातील छापील मजकूर हेच प्रमाण मानून वाचक डोळे झाकून विश्वास ठेवतात.वृत्तपत्रांनी जन माणसांचा विश्वास जपला आहे. असे प्रतिपादन जेष्ठ नागरिक आणि माजी सरपंच अशोकराव आगलावे यांनी केले.
भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सावळीविहीर येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते जगन्नाथ वाघमारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्धन जपे पा. म्हणाले की,वृत्तपत्र व्यवसाय करत असताना विक्रेते भल्या पहाटे वृत्तपत्र टाकत उन,वारा,पाऊस यांची तमा न बाळगता प्रत्येक दिवस सेवा देत असतात. म्हणूनच आपण घरात बसून देशातील ,जगातील घडामोडी बातम्याद्वारे समजू शकतो. असे सांगितले.
राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील वृत्तपत्र विक्रेते जगन्नाथ वाघमारे वयाच्या 63 व्या वर्षीही आजारपणाला न कंटाळता 33 वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचे काम करत आहे.हे विशेष आहे.भविष्यात वृत्तपत्राला पूर्वीसारखे सोन्याचे दिवस येतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.या वेळी कैलास सदाफळ,किरण आगलावे,मेरगुवार अण्णा,राजेंद्र भागवत,संजय धुमाळ,अप्पासाहेब मते,संजय वाघमारे,सुंदर वाघमारे, पत्रकार राजकुमार गडकरी, अमोल वाघमारे,राजेंद्र दूनबळे आदींसह वृत्तपत्र वाचक व नागरिक यावेळी उपस्थित होते.
0 Comments