लक्ष्मीवाडी साखर कारखान्याच्या पतपेढीचे माजी सचिव चांगदेव भागाजी कुऱ्हे यांचे निधन! सावळीविहीर व परिसरात हळहळ!

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील गोदावरी शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याच्या पतपेढीतील निवृत्त सचिव  चांगदेव भागाजी कुऱ्हे यांचे 30 सप्टेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले.


 त्यांचे मृत्यू समयी वय 72 वर्षे होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे सावळी विहीर , लक्ष्मीवाडी व परिसरात मोठे दुःख व्यक्त होत आहे. कै. चांगदेव भागाजी कुऱ्हे हे  शिर्डी येथील श्री आओसाई खंडोबा मंदिरात सचिव म्हणून काम करत होते. शांत, मितभाषी,मनमिळावू, धार्मिक स्वभावाचे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले सुसंस्कृत व सुशिक्षित असे कुटुंब घडवले. त्यांचा श्रीधर हा मुलगा चासनळी येथे इलेक्ट्रिशन दुकान चालवतो तर दुसरा मुलगा अशोक हा साई संस्थान मध्ये नोकरीला आहे तर मुलगी अर्चनाताई या निमगाव तालुका राहाता येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत. त्यांचे मुळगाव बेलापूर तालुका श्रीरामपूर असून तेथे  शेती आहे. नातवंडेही सुशिक्षित आहेत. असा सुशिक्षित परिवार त्यांनी घडवला. अशा सुस्वभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या कै. चांगदेव भागाजी कुऱ्हे यांचे निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री चांगदेव महाराज मंदिरा शेजारी गोदावरी तिरी श्रीक्षेत्र पुणतांबा येथे होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी ग.भा. सत्यभामा चांगदेव कुऱ्हे, भाऊ ज्ञानदेव भागाजी कुऱ्हे ,भावजय विठाबाई ज्ञानदेव कुऱ्हे ,मुलगा  श्रीधर चांगदेव कुऱ्हे  सून बेबीताई श्रीधर कुऱ्हे, मुलगा अशोक चांगदेव कुऱ्हे तसेच सुनबाई सुलोचना अशोक कुऱ्हे ,मुलगी अर्चना बाळासाहेब गाडेकर तसेच त्यांचे नातवंड ,जावई बाळासाहेब गाडेकर आदी मोठा परिवार आहे. त्यांना सावळीविहीर व  परिसरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments