घूमनदेव जि ,प,शाळा नवीन खोलीचे उद्घाटन

टाकळीभान प्रतिनिधी- मा.खासदार श्री.सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून मिळालेल्या शाळा खोलीचे उद्घाटन श्रीरामपूर तालुक्याचे युवा नेते मा.प्रशांत दादा लोखंडे ,यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,

      यावेळी शिवसेना जिल्हा संघटक मा. श्री.दादासाहेब कोकणे ,शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप पा वाघ,शिवयोगी नटराज महाराज, शिवसेना तालुका संघटक पप्पुमहाराज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    या प्रसंगी मा प्रशांत लोखंडे साहेब यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगून मी देखील जील्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होतो असे सांगितले .
   तसेच शाळेसाठी जागा देणारे शिवयोगी नटराज महाराज,कांगुणे परिवार,शिंदे परिवार,खंडागळे परिवार,वाबळे परिवार तसेच शाळेसाठी बोअर देणारे डॉक्टर नवले साहेब,मोटर देणारे अल्ताफ भाई शेख,पाईप देणारे सुभाष तांदळे याच्यासाठी विशेष गौरव उद्गगा र काढले व सर्वांचा यथोचित सन्मान केला.
     या प्रसंगी ,सरपंच श्री.श्रीपत गायकवाड,उपसरपंच श्री गीताराम जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मां आबासाहेब शिंदे घूमनदेव माजी सरपंच बाळासाहेब कांगूने ,सोसायटीचे चेअरमन श्री आबासाहेब कांगुने,व्हा चेअरमन श्री रणजित बोडखे,माजी चेअरमन आबासाहेब रेवजी पा कागुने ,मां डॉक्टर नवले , तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा दिनकर मामा वाबळे, सागर वाघमारे,सुभाष कांगुने ,सूर्यभान मुंजाळ,रावसाहेब जाधव ,महेश घोडे ,कय्यूम भाई,मोहन कुमावत,रवींद्र शिंदे,रवी जाधव,मंगेश गायकवाड ,मनेश वेताळ सर,पोस्ट मास्तर पाचपिंड साहेब,अण्णासाहेब खंडागळे,बहिरू कांगुने,साक्षी ठोकळ मॅडम,मुख्याध्यापक महापुरे मॅडम,साळुंके सर ,श्री श्रीपाद क्षीरसागर सर,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,सर्व सोसायटी सदस्य ,ग्रामस्थ ,पालक,उपस्थित होते.याप्रसंगी श्री अशोक गायकवाड सर व दिनकर मामा वाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी माननीय साईलता सामलेटी मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या,
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय शिंदे सर यांनी केले प्रास्ताविक श्री आनंद वाघ सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक महापुरे मॅडम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments