श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. राहाता तालुक्यातील राजुरी येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात सन्माननीय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेला प्रवरा सांस्कृतिक महोत्सव सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांना भारतीय सण उत्सव व त्यांचे महत्त्व समजावे सण कसे साजरे करावे याची माहिती तसेच या मोबाईलचे युगामध्ये माणसे एकमेकांपासून दुरावली व संवाद तुटत चाललेला आहे या निमित्ताने एकत्र येऊन संवाद भावा स्नेह आपुलकी निर्माण होण्यासाठी होण्यासाठी मदत व्हावी म्हणून नवरात्र महोत्सवामध्ये मोर्चामध्ये दांडिया महोत्सव घेण्यात आला. त्यामध्ये विद्यार्थी व त्यांचे आई-वडील, ग्रामस्थ, मोठ्या उत्साहात सहभागी झाले.व दांडिया खेळण्यात मुलांबरोबर एकत्र येऊन आई-वडील, ग्रामस्थ, शिक्षकांनी आनंद लुटला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मुस्ताक शेख सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व महोत्सवाची संकल्पना सांगितली याप्रसंगी लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधीने सन्मानित ) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका, सौ लीलावती सरोदे,प्रकाश पाटील, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती पाटील गोरे, उपाध्यक्ष रामजी पाटील लाळगे सरपंच सौ संगीता पठारे उपसरपंच डॉ. सोमनाथ गोरे पाटील प्रवरा सहकारी बँकेचे संचालक काकासाहेब गोरे राजुरी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सुधीर गोरे, तुकाराम पाटील गोरे, भास्कर कदम, आर डी कदम प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या प्राचार्य कुमकर मॅडम,व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास धावणे सरांनी केले या दांडिया महोत्सवानिमित्त आनंद लुटल्यानंतर सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य मुस्ताक शेख सर, सौ कल्पना नेहे, सौ रोकडे वैशाली, शेंडगे सर, श्रीमती पल्लवी कोकणे, किशोर भारती, प्रदीप मगर बाळासाहेब घोरपडे, सौ आहेर सुलभा, सौ राऊत अलका, श्रीमती त्रिवेणी धूळसैदर. श्रीमती श्रीमती पवार सुनिता, श्रीमती दिवे मॅडम, श्रीमती वैशाली साबळे, सौ बांद्रे मॅडम भूमिका तरकसे,प्रयत्न केले आहे
0 Comments