नागपूर ( राजकुमार गडकरी याचकडून)
नागपूर येथे विजयादशमीला होणाऱ्या धम्मदीक्षा 68 व्या सोहळ्यासाठी लाखो अनुयायी नागपुरात दाखल झाले आहेत.
भारतातील प्रत्येक राज्याच्या कानाकोपऱ्यातून, विदेशातून अनुयायी मोठ्या प्रमाणात रेल्वेने विमानाने ,बसणे किंवा खाजगी प्रवासी वाहनातून नागपुरात आले आहेत. नागपूर शहरांमध्ये सर्वत्र स्वागत कमानी, मंडप, वाहन पार्किंग, रस्त्यावर बॅरिकेट, सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे येथे आलेल्या हजारो लाखो अनुयायींच्या सेवेसाठी भीमसैनिक तसेच विविध संघटना मार्फत मोफत चहा, नाश्ता, भोजन सेवा देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक स्नानगृह व शौचालय उभारण्यात आले आहेत. नागपूर दीक्षाभूमी परिसर नागपूर व कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे मोठ्या संख्येने अनुयायी विजयादशमीच्या आदल्या दिवशी दाखल होत वंदना करत आहेत. येथे आजच दसऱ्याच्या आदल्या दिवशी सकाळपासून लाखो अनुयायी दर्शन घेत असून संपूर्ण नागपूर शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी व बौद्ध ,भिक्षुक, व अनुयायांनी गजबजून गेले आहे. सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौज फाटा ठिक ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. हजारो स्वयंसेवक, भीमसैनिक या परिसरात देखभाल करत आहेत. तसेच सर्वत्र विविध स्टॉल, माहिती केंद्रे,मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे, संपन्न होत आहेत.
0 Comments