राजकुमार गडकरी
शिर्डी ( प्रतिनिधी) मोठी जिद्द घेऊन बिग बॉस घरामध्ये दाखल झालेला सुरज चव्हाण हा अभिजीत सावंत आणि निकी तांबोळीला मात देत बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनला आहे.
बिग बॉस मराठी 5 च्या पहिल्या दिवसापासून सूरज चव्हाणला चाहत्यांकडून मोठा पाठिंबा मिळत होता. सूरज देखील आपल्या आगळ्या वेगळ्या व जरा हटके स्टाइलने आणि आपल्या बोबड्या भाषेत प्रेक्षकांची मने जिंकत होता. जेव्हा बिग बॉसने सूरज आणि अभिजीतला घराचे दिवे बंद करून तसेच आपल्या नावांच्या पाट्या घेऊन या घराचा निरोप घ्यावा असं आदेश दिले तेव्हा सूरज प्रचंड भावुक झाला होता. जेव्हा शेवटच्या क्षणाला बिग बॉस रितेश यांनी अभिजीत व सुरज यांचे हात धरून वर केले त्यावेळेस लाखो प्रेक्षकांचे, चाहत्यांची मोठी धडकन वाढली गेली होती. दोघांपैकी कोण विजेता होणार !असा सर्वांनाच प्रश्न होता. आणि बॉस रितेशसरांनी या बिग बॉस पर्वाचा विजेता सुरज चव्हाण चे नाव जाहीर करताच सर्वत्र जल्लोष झाला. सुरज चव्हाण ज्या गावात राहतो, ज्या घरात राहतो, त्या घरात , बारामती जवळच्या गावात जयजयकार करत, नाचत गात , भंडारा व गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला. सुरज चव्हाणचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला , मोठ्या बहिणीने सांभाळ केलेला, अतिशय गरीब, व क्रांतिकारी रामोशी समाजात जन्मलेला, जिद्दी, मेहनती, भोळाभाबडा असा असणारा, हा एका छोट्या गावातील रीलस्टार कलाकार आज बिग बॉस चा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सुरजने हे यश त्यामुळेच बिग बॉसच्या या यशामुळे सूरजने सर्वांच्या हृदयात मोठी जागा निर्माण केली आहे.या सुरज चव्हाण मुळे हे बिग बॉसचे पर्वही सर्वांच्या स्मरणात राहील असे ठरले.
बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला,’बिग बॉसच्या घरात मी आलो आणि विजेताही ठरलो.हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी!माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन’. असं तो म्हणाला.बिग बॉस मराठी 5 मध्ये 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याला रितेश सरांनीही आपल्या हटके स्टाईलने या महाअंतिम सोहळ्याची शोभा वाढवली. सुरज चव्हाण ची बिग बॉस विजेता ठरल्यामुळे सर्वत्र मोठी चर्चा सध्या सुरू असून त्याचे सर्व क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे. सुरज वर कौतुकांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments