शिर्डी विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा भूमिपूजन समारंभ बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी प्रणाली द्वारे होणार!मान.मुख्यमंत्री ,दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व राज्याचे महसूल मंत्री आदीसह मान्यवर या कार्यक्रमाला काकडीला उपस्थित राहणार!

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 दुपारी एक वाजता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ काकडी येथे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी प्रणाली द्वारे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ना.अजित दादा पवार तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्रीना. मुरलीधर मोहोळ व महसूल मंत्री ना. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून श्री साईबाबांच्या दर्शनाला देश विदेशातून मोठ्या संख्येने साईभक्त येत असतात. त्यामध्ये विमानाने येणारे जाणाऱ्या साई भक्तांची संख्या मोठी वाढली आहे. त्यामुळेच नागरी विमान वाहतूक विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांच्यावतीने शिर्डी विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा भूमिपूजन समारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी प्रणाली द्वारे होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, तसेच विधान परिषदेत सदस्य आमदार किशोर दराडे ,आमदार राम शिंदे ,आमदार सत्यजित तांबे, आमदार शिवाजीराव गर्जे, विधानसभा सदस्य व माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आमदार बबनराव पाचपुते, आमदार शंकराव गडाख, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे ,आमदार संग्राम जगताप ,आमदार आशुतोष काळे ,आमदार प्राजक्ता तनपुरे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, तसेच जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व नागरी विमान वाहतूक महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव संजय सेठी, आदी उपस्थित राहणार आहेत. शिर्डी विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा हा भूमिपूजन समारंभ बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2024 दुपारी एक वाजता शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ काकडी येथे होणार आहे. अशी माहिती शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विमानतळ संचालक गौरव उपश्याम,व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांण्डेय यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments