साई पुण्यतिथीनिमित्त धर्मपुरी तामिळनाडू येथील जे पी बालसुब्रमण्यम यांच्या एक कोटी देणगीतून सहा नग व्हेंटिलेटर मशीनचे संस्थांनला लोकार्पण!

शिर्डी ( प्रतिनिधी) श्री साईबाबांना देश-विदेशातील साई भक्तांकडून श्रद्धेपोटी विविध स्वरूपात देणगी दिली जाते. आजही श्री साईबाबांची पुण्यतिथी आहे. आज शनिवारी पुण्यतिथीनिमित्त व विजयादशमी निमित्त
तामिळनाडू राज्‍यातील धर्मपुरी येथील देणगीदार साईभक्त श्री. जे. पी. बाल सुब्रमण्यम यांच्या सुमारे एक कोटीच्या देणगीतून  साईबाबा हॉस्पिटल येथे  बसविलेल्या ०६ नग व्हेंटिलिटर मशिनचा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या 


मुख्‍य दिवशी साई संस्थानचे अध्‍यक्ष तथा प्रधान जिल्‍हा न्‍यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्‍के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) व प्रशासकीय अधिकारी तथा प्र उपमुख्‍य का‍र्यकारी अधिकारी सं‍दीपकुमार भोसले, मुख्‍यलेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे,  वैद्यकिय संचालक डॉ शैलेश ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा ‌हॉस्पिटलच्या आयसीयू विभागात पार पडला. यावेळी संस्थांनच्या अधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच रुग्णांचे कुटुंबीय, साईभक्त  आदी उपस्थित होते. साईभक्त देणगीदार जे पी बालसुब्रमण्यम यांचा साई संस्थांनच्या अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के )यांनी त्यांचा श्री साई मूर्ती शाल देऊन सत्कार केला.

Post a Comment

0 Comments