अहिल्यानगर जिल्हा बँक निकाल: विखे-थोरात युतीचे वर्चस्व तरीही लंकेंसह विरोधकांची मुसंडी; २१ संचालकांची अंतिम यादी जाहीर,
अहिल्यानगर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सहकार क्षेत्रातील सत्तासंघर्षाचे चित्र स्पष्ट झाले आहे. २१ जागांच्या संचालक मंडळात ११ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १० जागांसाठी पार पडलेल्या चुरशीच्या मतमोजणीत सत्ताधारी विखे-थोरात पॅनलला संमिश्र यश मिळाले असून विरोधकांनीही जोरदार धक्के दिले आहेत.
नवनिर्वाचित २१ संचालकांची अधिकृत यादी:
१. डॉ. सुजय विखे पाटील - राहाता (बिनविरोध)
२. करण ससाणे - श्रीरामपूर (बिनविरोध)
३. प्राजक्त तनपुरे - राहुरी (विजयी)
४. शंकरराव गडाख - नेवासा (बिनविरोध)
५. अक्षय कर्डिले - अहिल्यानगर (बिनविरोध)
६. संजीवनी शिंदे - अकोले (विजयी)
७. रणजितसिंह देशमुख - संगमनेर (बिनविरोध)
८. बिपिन कोल्हे - कोपरगाव (बिनविरोध)
९. राजश्री घुले - शेवगाव (बिनविरोध)
१०. मोनिका राजळे - पाथर्डी (बिनविरोध)
११. नीलेश लंके - पारनेर (विजयी)
१२. दत्तात्रय पानसरे - श्रीगोंदा (बिनविरोध)
१३. ज्योती शिंदे - कर्जत (विजयी)
१४. सचिन घुमरे - जामखेड (बिनविरोध)
१५. सचिन जगताप - बिगरशेती (बिनविरोध)
१६. आशुतोष काळे - शेतीपूरक (विजयी)
१७. अनुराधा नागवडे - महिला राखीव (विजयी)
१८. संगीता वाघ - महिला राखीव (विजयी)
१९. कारभारी जावळे - ओबीसी (विजयी)
२०. वैभव पिचड - अनुसूचित जाती (विजयी)
२१. गणपत सांगळे - व्हीजेएनटी (विजयी)
0 Comments