मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जरंडी जिल्ह्यात द्वितीय,दिवाळीच्या पर्वावर जरंडी करांना खुशखबर---





दिलीप शिंदे 
सोयगाव, दि.०७-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात राज्यस्तरीय स्पर्धेत पोहचलेल्या सोयगाव तालुक्यातील जरंडी गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात द्वितीय ठरले आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शासनाच्या ग्रामविकास विभागाचे वतीने जाहीर केलेल्या स्पर्धेच्या निकालात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६ मध्ये जरंडी जिल्ह्यात द्वितीय असल्याचे घोषित केले त्यामुळे ऐन दिवाळीच्या पर्वावर जरंडी करांना खुशखबर मिळाली आहे .


दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी सुनिल मंगरुळे यांच्या नेतृत्वाखाली जरंडी ग्रामपंचायतने या अभियानात सहभाग घेतला होता यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांकावर आलेल्या जरंडी ग्रामपंचायत ने जिल्हा, विभाग आणि राज्य या तीन स्तरावर स्पर्धे साठी जरंडी गाव पात्र झाले होते विभाग आणि राज्यस्तरावरील पडताळणी झाल्या वर अखेर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे माजी सरपंच वंदनाताई पाटील,माजी सरपंच स्वातीताई पाटील यांच्या कार्यकाळात गावात झालेल्या कामांची पाच तपासणी पथकांनी तपासणी केली होती गावात ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, वंदनाताई पाटील,स्वाती पाटील या दोन्ही महिला सरपंच ,उपसरपंच संजय पाटील,यांनी गाव परिसर स्वच्छ, महिलांना आर्थिक सक्षमीकरण, महिला बचत गट उद्योग यासह विविध उपक्रम राबविले ग्रामपंचायतीने हुतात्मा स्मारक गार्डन, संगीत कारंजे, बाजार ओटे,संगीत विद्यालय, ऑक्सिजन पार्क,लोकसभागातून स्वच्छता,स्मशानभूमीत वृक्ष लागवड, बोलकी वृक्ष लागवड, अंगणवाडी सुशोभीकरण, शाळा सुशोभीकरण,बाल स्नेही स्वच्छता गृह,यासह जेष्ठ नागरिक कक्ष,सुसज्ज अभ्यासिका,सी सी टी व्ही कॅमेरे व गावात रंगरंगोटी,हुतात्मा स्मारकात पंचवीस हजार वृक्ष लागवड, आदी विशेष उपक्रम राबविले आहे दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जरंडी गावाने राज्यस्तरीय मजल मारली होती राज्यस्तरीय तपासणी नंतर शुक्रवारी दिवाळीच्या पर्वावर निकाल घोषित झाला आहे.

Post a Comment

0 Comments