दिलीप शिंदे
सोयगाव दि. २१--- राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे लाडकी बहिण योजना केवळ कागदावर आहे प्रत्यक्षात ९३ लाख बहिणींचा निधी बंद केला आहे असा टोला आमदार अंबादास दानवे यांनी शनिवारी ( दि.२१ ) सोयगावात महायुती सरकारला लगावला. जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरावे असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले ते शनिवारी उद्धव सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार व नियुक्ती पत्र वितरण मेळाव्यात सायंकाळी सहा वाजता ते बोलत होते.
यावेळी संपर्क प्रमुख सुभाष पाटील,जिल्हा प्रमुख विठ्ठल बदर, सह संपर्क प्रमुख राजेंद्र काळे,रघुनाथ चव्हाण, तालुका प्रमुख दिलीप मचे, किसान सेना तालुका संघटक चंद्रासअप्पा रोकडे,शेखर चव्हाण, सागर पाटील,अनिल गाडेकर, ह भ प जान्हवी सोनवणे,रघुनाथ फुसे, आदींची उपस्थिती होत. संपर्कप्रमुख सुभाष पाटील यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्याची घोषणा केली यावेळी तालुका कार्यकारिणी मध्ये २३ नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करून आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले कर्जमाफी,लाडकी बहीण, दुष्काळ अनुदान, या सरकार च्या घोषणावर चौफेर टीका करत आमदार अंबादास दानवे यांनी नवीन पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना केवळ हाताच्या एका अंगठ्या वर कर्जमाफी दिली परंतु या सरकारने केवळ घोषणा केली अद्यापही शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी अनुदान मिळाले नाही तर दुसरीकडे कर्जमाफी ची रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.प्रस्थापित विरुद्ध लढा द्यायला तयार व्हा असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना या मेळाव्यात केले.आगामी निवडणुकीत नक्कीच जनता शिवसेनेच्या हातात सत्ता देईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भगवान वारंगने, शहर प्रमुख रविंद्र काटोले ,जि प सदस्या सुनिताबाई चव्हाण, चंद्रशेखर चव्हाण,पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील, सागर पाटील, सुर्यभान गवळी,शेषराव लोखंडे, अनिल गाडेकर, शाखा प्रमुख गणेश कापरे,राजेंद्र गव्हाड,भिका पाटील, मयुर गातवे,रमेश पवार, गणेश जाधव,ईश्वर जाधव, बबन रोकडे, मनोज निकम, सुरेश चव्हाण, निलेश पाटील, राजेंद्र मासरे,आन्ना वाडेकर, परशुराम चव्हाण, सागर लाडगे,विश्वनाथ वारगणे,प्रतापदादा राठोड, प्रताप चव्हाण,उपशहर प्रमुख दिपक बागुल, सुरेश फुसे, सुनिल राऊत, योगेश नागपुरे, विनोद पवार,सविता क्षीरसागर, लिलाबाई क्षीरसागर, कलाबाई ,सिमाबाई,आदींसह तालुक्यातील शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आभार दिलीप मचे यांनी केले.
0 Comments