अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात मतदान केंद्र निश्चित!

लोहगाव( प्रतिनिधी)-
अहिल्यानगर मधील बहुचर्चित अशा व राज्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सार्वत्रिक निवडणूक उद्या होत असून दहा जागांसाठी होणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीत 27 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे 11 संचालक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित दहा संचालकांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून या मतदानासाठी जिल्ह्यामध्ये मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रे मतदारांना माहिती व्हावी यासाठी ती प्रत्येक तालुक्यात कोठे आहे हे प्रसिद्ध करण्यात आले असून जिल्ह्यात अकोले तालुक्यातील मतदान केंद्र हे जिल्हा परिषद शाळा केजी रोड, अकोले येथे असून जामखेड येथे जिल्हा परिषद शाळा मराठी मुली येथे हे केंद्र आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा मुले मुली कर्जत येथे तर कोपरगाव येथे नगरपालिकेची शाळा क्रमांक तीन व सहा येथे हे मतदान केंद्र असणार आहे. त्याचप्रमाणे अहिल्यानगर शहरांमध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथे हे मतदान केंद्र आहे. नेवासा येथे जिल्हा परिषद शाळा नेवासा खुर्द तर पारनेर येथे न्यू इंग्लिश स्कूल सुपा रोड येथे हे मतदान केंद्र असणार आहे. त्याचप्रमाणे पाथर्डी येथे जिल्हा परिषद शाळा नवनाथ नगर येथे तर राहता शहरांमध्ये सेंट जॉन्स स्कूल येथे हे मतदान केंद्र असणार आहे. राहुरी येथे भागीरथीबाई तनपुरे कन्या माध्यमिक विद्यालय तर संगमनेर ते भिकाजी तुकाराम मेहेर विद्यालय येथे हे मतदान केंद्र राहणार आहे. शेवगाव येथे आदर्श विद्यामंदिर शाळा तर श्रीगोंदा येथे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय त्याचप्रमाणे श्रीरामपूर येथे दादा वामन जोशी नविन मराठी शाळा या ठिकाणी हे मतदान केंद्रे असणार असून जिल्हा सहकारी बँकेसाठी या मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. मतदान प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली असून मोठ्या बंदोबस्तात सर्व मतदान केंद्रांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त व अधिकारी हे तैनात करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments