चार हाजार रुपये भावासाठी व्यापक आंदोलन करावे लागेल... विठ्ठलराव शेळके

शिर्डी प्रतिनिधी 

आजचा निर्णय चुकला आहे गेली दोन महिन्यापासून ऊसाला पहिली उचल 4000 रूपये मिळावी याकरीता रास्तारोको आंदोलन अनेक वेळा केले निवेदन दिले.

 आज दुष्कात ऊसाचे उत्पन्न घटले साखरेचे भाव 5500 असताना आपले शेतकरी एकजूट नसल्याने  व साखर कारखानदार यांनी संगणमताने 3450 जाहीर केला आहे . कारखानदार 3250 च्या पुढे नंतर 100 व परत 100 साठी शेतकरी संघटनेने पुन्हा अंदोलन करायाचे का ? असा सवाल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी केला आहे. 
यापुढे सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांनी एकत्र येऊन आपली साखर हलू देऊ नये तरच आपल्याला 4000 रुपये भाव मिळेल .यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजीत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक कारखानदाराच्या विरोधात आंदोलन करावे लागेल व आपल्या न्याय मागणीसाठी शेतकऱ्यांनी उसाच्या अंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी एका पत्रकाद्धारे केले आहे

Post a Comment

0 Comments