*हभप श्री संजयजी महाराज यांच्या हरी किर्तनाने श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी येथे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायणाचा भव्यदिव्य वातावरणात प्रारंभ* 🚩
सालाबादप्रमाणे यावर्षीही ग्रामदैवत *श्री कालभैरवनाथ जयंतीनिमित्त* बनपिंपरी येथे अखंड हरिनाम सप्ताह व *जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गाथा पारायण* सोहळ्याचा प्रारंभ झाला.
पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ब्रह्मलीन सदगुरु *श्री नारायणगिरीजी महाराज* यांचे कृपापात्र शिष्य *ह.भ.प. श्री संजयजी महाराज जगताप* यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाली. त्यांनी आपल्या अमृतवाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
माजी आमदार *स्व. अरुणकाका जगताप* यांचे चिरंजीव *श्री संग्राम जगताप* व समस्त गावकरी मंडळी यांनी या सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या सप्ताहातील गाथा पारायणासाठी *श्री क्षेत्र पंढरपूर व आळंदी* येथील सुमारे २५ पंचवीस महाराज आठ दिवस येथे थांबून आहेत. तसेच साधारण *२५० च्या आसपास बालगोपाल वारकरी टाळकरी* या सप्ताहात सहभागी झाले आहेत.
या भव्य दिव्य कीर्तनात महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या -
> *"भक्तवत्सल दिनानाथ, तिन्ही लोकी ज्याची मात"*
या अभंगावर निरूपण करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
> *"ज्ञानाविरहीत गोष्टी न सांगाव्यात, ऐसी कीर्तन मर्यादा आहेत संतांच्या घरची"*
अशा प्रकारे कुठल्याही प्रपंचाच्या वा ज्याला शास्त्राचा आधार नाही अशा फोलकट विषयाला थारा नसलेले, *शास्त्रशुद्ध कीर्तन* म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प. श्री संजयजी महाराज जगताप हे आपल्या कीर्तनातून अध्यात्मिक कार्याबरोबरच *समता व समाजप्रबोधनावर* नेहमीच भर देतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेत या सप्ताहात सन्माननीय *श्री संग्राम जगताप* यांनी ह.भ.प. श्री संजयजी महाराज जगताप यांना *सन्मानचिन्ह* देत, त्यांचे आदरातिथ्य करून सन्मानित केले व आशीर्वाद घेतले.
*।। राम कृष्ण हरी ।। 🙏*
---
0 Comments